नागेश रायपुरे, मारेगाव: प्रजासत्ताकदिनाच्या पर्वावर स्वरधारा ग्रुप मारेगावद्वारा आयोजित नृत्य स्पर्धत समूह नृत्यात आम्रपाली ग्रुप नागपूर तर एकलमध्ये जय कैशवाश नागपूर, साक्षी जाधव वणी यांनी प्रथम क्रमांक पटकविला.
येथील स्वरधारा ग्रुप मारेगावच्यावतीने प्रजासत्ताक व स्वतंत्रदिनाचे या पर्वावर विविध समाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ग्रामीण भागातील कलाकारांना वाव देण्यासाठी एकल व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत समूह नृत्यामध्ये आम्रपाली ग्रुप नागपूर प्रथम क्रमांक पटकाविला. वैष्णवी बुटे ग्रुप वणी व आदर्श हायस्कूल मारेगाव यांना विभागुण द्वितीयत्तर विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कल मारेगाव तृतीय क्रमांक पटकविला.
तसेच एकल नृत्य स्पर्धेत जय कैशवाश नागपूर व साक्षी जाधव वणी विभागून प्रथम, जय बोरघाटे द्वितीय, सुनील पिंपळकर वणी व मिताली पांडे वणी यांना विभागून तृतीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेत शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सचिन वानखडे व प्रियंका चव्हाण यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमसाठी स्वरधारा ग्रुपचे सतीष पांडे, नागेश रायपुरे, अशोक कोरडे, आकाश बदकी, विवेक बोबडे, सचिन देवाळकर, विशाल किन्हेकार, श्रीकांत सांबजवार, लाभेश खाडे, आशीष येरणे, शेख इफ्तेखार, हरिश नेहारे, मोहन शेंडे, निखिल कोरडे, संदीप नागोसे, आकाश येरमे, गणेश मडावी, संदीप आत्राम, सागर लोणारे आदींनी परिश्रम घेतले..