वणीत रविवारी रंगणार विदर्भ आयडॉल ही मेगा स्पर्धा
बाजोरिया लॉन येथे स्पर्धेचे आयोजन, विदर्भातील नामवंत गायकांचा सहभाग
बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी वणीतील बाजोरिया लॉन येथे स्वरधारा विदर्भ आयडॉल ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण मुंबई येथील इंडियन आयडॉल (2024) फेम उत्कर्ष वानखेडे हे राहणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता उत्कर्ष वानखेडे यांचा गीत गायनाच्या कार्यक्रमाची मेजवानी वणीकरांना मिळणार आहे.
श्री साई म्युझिकल गृप, श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र, मैत्रेय फाउंडेशनतर्फे व स्व. पंडीत रामगोपालजी जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे तसेच उत्कर्ष वानखेडे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
विदर्भातील इतर तालुक्यातील राउंडला स. 9 वाजता सुरुवात होणार आहे. त्यानंतर स. 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर संध्या. 7 वा. उत्कर्ष वानखेडे यांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमादरम्यान संगीतकार रविंद्र वानखेडे, संगीतकार व राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्राप्त विजेते दिलिप रोकडे, तसेच सुप्रसिद्ध तबला वादक व शिक्षक जयंत कुचनकर यांचा सत्कार केला जाणार आहे.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. आयोजक संतोष जोशी, दिगांबर ठाकरे, जयप्रकाश सूर्यवंशी यांच्या आयोजनात, अजित खंदारे, अरुण डवरे यांच्या संयोजनात व सविता डोर्लीकर, विणा मोहितकर, सुचिता गहुकर यांच्या सहआयोजनात ही स्पर्धा होत आहे.



Comments are closed.