पेंटर ठरला बुलेटचा मानकरी, कोणते खेळाडू ठरलेत बक्षिसांचे मानकरी ?

झुकेगा नही साला... बक्षिस वितरण सोहळ्यात ऍड कुणाल चोरडिया झाले भावूक

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 11 दिवसांपासून वणीत रंगलेले क्रिकेटचे महायुद्ध अखेर शांत झाले. या लीगमध्ये एकापेक्षा एक मॅचचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. अत्याधुनिक तंत्राचा वापर, सर्टिफाईड पंच, उत्कृष्ट समालोचन, हजारों प्रेक्षकांची उपस्थिती व जल्लोष, बक्षिसांची प्रचंड लयलूट व आयोजकांचे जबरदस्त नियोजन याने ही लीग ना भूतो न भविष्यती ठरली. अंतिम सामना बघण्यासाठी मैदानावर हजारो प्रेक्षक उपस्थित होते. मात्र इतर ठिकांनावरूनही 25 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी यूट्यूबवरून लाईव्ह सामन्यांचा आनंद घेतला. अंतिम सामन्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण सोहळा पार पडला. यावेळी कमिटीच्या बक्षिसा व्यतिरिक्त इतर क्रीडाप्रेमींनीही खेळाडुंवर लाखोच्या बक्षिसांची अक्षरश: उधळण  केली. पावसाने सामन्यात अनेकदा व्यत्यय आणला. लीग सुरू असतानाच अनेक अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करून संचालक ऍड. कुणाल चोरडिया व संपूर्ण कमिटीने ही लीग ऐतिहासिक बनवली.

रविवारी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता लीगचा अंतिम सामना आमेर व जन्नत संघात खेळला गेला. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघ जीव तोडून खेळले. मात्र त्यात अखेर आमेर संघाने बाजी मारत T-10 लीगवर कब्जा केला. त्यांनी जन्नत संघाचा 27 धावांनी पराभव केला. फायनलमध्ये संघ अडचणीत असताना संकटमोचन म्हणून आलेला व मैदानावर चौकार षटकाराची बरसात करणारा आमेर संघाचा कर्णधार रवि राजूरकर उर्फ मसिहा याला सामन्याचा सामनावीर ठरला.

पेंटर ठरला बुलेटचा मानकरी
बेस्ट विकेट किपर आमेर संघाचा तौसिफ खान ठरला. तर कॅच ऑफ द तुर्नामेंट हा रेनबो संघाचा कुणाल पारखीने घेतलेला झेल ठरला. त्याला 5100 रुपयांचे बक्षिस देण्यात देण्यात आले. उत्कृष्ट बॉलर म्हणून 25 गडी बाद करणारा आमेर संघाचा बॉलर व परपल कॅप होल्डर संदीप मांढरे ठरला. त्याला 11000 हजारांचे बक्षिस देण्यात आले. बेस्ट बॅट्समन ऑफ तुर्नामेंट हा अवॉर्ड रवि राजूरकर यालाच मिळाला. त्याला 11000 रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तर या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असलेले मॅन ऑफ द सिरिजचा मानकरी हा जन्नत खेळाडू अष्टपैलू खेळाडू अक्षय उर्फ पेंटर धवंजेवार ठरला. त्याला सन्मानचिन्ह आणि बुलेट देण्यात आली. या व्यतिरिक्त अनेक क्रीडा प्रेमींनी खेळाडुंवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण केली.

झुकेगा नही साला… ऍड कुणाल चोरडिया झाले भावूक
”गेल्या 11 दिवसांपासून सुरु असलेल्या लीगचा प्रवास आज थांबतोय. खूप चांगला अनुभव होता हा. कमेटी मेंबर्स, ग्राउंड स्टाफ यांनी प्रचंड परिश्रम घेतले. लीगमध्ये सहभागी 10 ही टीम खूप छान लढल्या. त्यासर्वांचे आभार. तसेच ही लीग यशस्वी करण्यात सर्वात मोठा वाटा उचलणा-या वणीकरांचेही आभार. लीग सुरू असताना अनेक संकटं आलीत. मात्र आम्ही त्याला समोरं गेलो. सातत्याने वरूणराजा विघ्ण आणत होता. मात्र आम्ही हरलो नाही लढलो. मी पुन्हा येईन व पुन्हा लढेन… लगाले तकदीर कितना है दम, मै नही झुकुंगा… मै झुकेगा नही साला…” असे म्हणताच प्रेक्षकांनी उत्कृष्ट व भव्य दिव्य सर्धेच्या आयोजनासाठी मैदानावर एकच जल्लोष करीत ऍड कुणाल चोरडिया यांचे आभार मानले. मनोगत व्यक्त करताना ऍड कुणाल भावूक झाले होते.

झुकेगा नही साला… !

फेअरप्ले अवॉर्डचा मानकरी माऊली मराठा या संघाला मिळाला. या संघाला 21 हजारांचे बक्षिस देण्यात आले. चतुर्थ बक्षिस 51000 हजार रुपयांचे बक्षिस व सन्मानचिन्ह राजपूत रॉयल्सला मिळाले. तर तिसरे बक्षिस रेनबो क्रिकेट संघाला 1 लाख रुपयांचे बक्षिस व सन्मानचिन्ह, दुसरे बक्षिस जन्नत संघाला 2.5 लाख रुपये तर आमेर संघाला 5 लाख रुपये व सन्नमाचिन्ह देण्यात आले.

जानेवारी महिन्यात होणार मोर्या क्लबची स्थापना
बक्षिस वितरण सोहळ्यात 13 उदयोन्मुख (इमर्जिंग) खेळाडुंचा सन्मान करण्यात आला. मोहम्मद अरमान, अंकुश रमावत, कौस्तुभ धानोरकर, रजनीश पांडे, विपूल पोटे, श्रीजीत भोयर, निखील तेलंग, मोहित शेख, आशुतोष दर्वे, जय देशकर, सौरभ बोंडे, प्रतिक मत्ते, सारंग माथनकर, रंजीत राजभर या 13 उदयोन्मुख खेळाडुंचा वर्षभराचा सर्व खर्च मोर्या क्रिकेट क्लबद्वारा केला जाणार आहे. जानेवारी महिन्यात या क्रिकेट क्लबचे थाटात उद्घाटन केले जाणार आहे. (पाहा प्रेक्षकांचा जल्लोष…)

बुंदेले, तोटे, शेख, संघदीप भगत, राजू खोंडे या सर्व पंचांचा सन्मान करण्यात आला. तसेच हिंदी समालोचक नागपूरहून आलेले अतूल व बुलढाण्याहून आलेले आरजे ओम व खेळपट्टी तयार करणा-या बादशहा याचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाप्रमुख नितीन भुतडा, नामदेवराव ससाणे आमदार उमरखेड, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, रवी बेलूरकर, संजय निमकर, राकेश खुराणा इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

या चॅम्पियन लीगच्या यशस्वीतेसाठी कमिटीचे अध्यक्ष ऍड कुणाल चोरडिया, उपाध्यक्ष मनीष गायकवाड, सचिव संदीप बेसरकर, सहसचिव राजू रिंगोले, कोषाध्यक्ष पियुष चव्हाण, सह कोषाध्यक्ष उमेश पोद्दार, कार्यप्रमुख कार्तिक देवडे, सहकार्यप्रमुख शुभम मदान, प्रसिद्धी प्रमूख तोसीफ खान, सहप्रसिद्धी प्रमुख मयूर घाटोळे, सल्लागार संघादीप भगत, सल्लागार प्रकाश तुराणकर, तौसिफ चीनी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. 

आमेर संघाचा T-10 चॅम्पियन्स लीगवर कब्जा… थरारक मॅचमध्ये मिळवला जन्नतवर विजय

पाहा अंतिम सामन्याचा थरार व बक्षिस वितरण सोहळा….

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.