एकाच षटकात ठोकल्या 27 धावा… प्रेक्षकांनी अनुभवला शेवटच्या ओव्हरचा थरार…

हार्ड हिटर अमोल मोहितेचे धडाकेबाज अर्धशतक.... क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आमेर 11 चा शानदार विजय

विवेक तोटेवार, वणी: शेवटच्या शतकात एम ब्लास्टर संघाला विजय मिळवण्याकरिता 11 धावांची गरज होती. आमेर संघाचा स्वप्नील बोंडे हा बॉलिंग करायला आला. हा शेवटचा ओव्हर वणीकर प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरला. स्वप्नीलने फक्त 3 धावा देत एक गडी बाद केला. तर या ओव्हमध्ये फिल्डरनेही कमाल दाखवली. या ओव्हरमध्ये एका प्लेअरने डाईव्ह मारून चौकार रोखला. सिक्सर जाताना एका प्लेअरने चक्क सीमारेषेबाहेर जात चेंडू पकडून मैदानात फेकला. हा संपूर्ण थरार सुरू असताना मैदानात प्रेक्षकांचा एकच जल्लोष सुरू होता. दुस-या एका सामन्यात हार्ड हिटर अमोल मोहितेने एकाच षटकात 4 सिक्सर खेचत 27 धावा कुटल्या. तसेच तुर्नामेन्टमधले दुसरे अर्धशतक केले. पारसमल प्रेमराज ज्वेलर्सतर्फे या चॅम्पियन लीगचे आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवारी 7 ऑक्टोबर रोजी 5 सामने खेळले गेले. आदल्या दिवशी पाऊस आल्याने मैदानात चिखल होते. त्यामुळे खेळ उशिरा सुरू झाला व प्रत्येक सामना हा 8 ओव्हर्सचा खेळण्याचा निर्णय झाला. प्रथम सामना हा आमेर नाईट रायडर विरुद्ध एम ब्लास्टर यांच्यात खेळला गेला. आमेर संघाने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 8 षटकात 66 धावांचे लक्ष एम ब्लास्टर संघाला दिले. आमेर संघाकडून सर्वाधिक धावा रवी राजूरकर यांनी केल्या. त्यांनी 9 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार ठोकत 21 धावा केल्या. एम ब्लास्टर संघाकडून प्रमोद चाडके यांनी 2 षटकात 3 गडी बाद केले. लक्षाचा पाठलाग करीत एम ब्लास्टर संघ 59 धावाच करू शकला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे आमेर संघाने हा सामना 7 धावांनी जिंकता आला. आमेर संघाचा संदीप खिरटकर याला सामनावीर ठरविण्यात आले. त्याने निर्धारित 2 षटकात 18 धावा देत 3 गडी टिपले. या विजयाने आमेर 11 हा संघ क्रमांक एकवर आला आहे.

दुसरा सामना हा जय महाकाली संघ विरुद्ध रेनबो संघ यांच्यात खेळला गेला. जय महाकाली संघाचा हार्ड हिटर व परिसरात ख्रिस गील अशी ओळख असलेल्या अमोल मोहिते याने एकाच षटकात 4 सिक्सर खेचत तब्बल 27 धावा कुटल्या. त्याने अर्धशतकीय खेळी खेळत 26 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे जय महाकाली संघाला 81 धावांचे टारगेट देणे शक्य झाले. तर धावांचा पाठलाग करताना रेनबो संघाला अवघ्या 61 धावाच काढता आल्या. हा सामना जय महाकाली संघाने 21 धावांनी जिंकला. आधीच्या मॅचमध्ये हिरो ठरलेल्या रेनबो संघाचा कर्णधार मॉन्टी याची बॅट मात्र या सामन्यात तळपली नाही. त्याला 13 चेंडूत 12 धावा काढता आल्या. या सामन्याचा सामनावीर अमोल मोहिते ठरला.

तिसरा सामना हा 11 टायगर रोअरिंग विरुद्ध छत्रपती वॉरिअर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात 11 टायगर रोअरिंग संघाने 9 गडी बाद 70 रन्स काढले. या संघाकडून सर्वाधिक धावा राहुल बावणे याने काढल्या. त्याने 12 चेंडूत 3 चौकार व एक षटकार खेचत 23 धावा केल्या. तर छत्रपती संघाला 65 धावाच काढता आल्या. छत्रपती संघाकडून कुणालाही धावपट्टीवर टिकून राहता आले नाही. शेवटच्या चेंडूवर छत्रपती संघाला 6 धावांची गरज होती. परंतु बॅट्समनला अवघ्या एका रन्सवर समाधान मानावे लागले. हा सामना 11 टायगर रोअरिंग संघाने 5 धावांनी जिंकला. राहुल बावणे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला.

चौथा सामना हा माऊली मराठा विरुद्ध जन्नत 11 यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करीत माऊली संघाने 9 गडी बाद 54 धावा काढल्या. कमी धावसंख्या असलेला हा सामना अटीतटीच्या झाला. जन्नत संघाला 8 गडी बाद 47 धावा करता आल्या. हा सामना माऊली मराठा संघाने 7 धावांनी जिंकला. संतोष ताजने याने माऊली मराठा संघाकडून उत्तम फिरकी गोलंदाजी केली. त्याने आपल्या निर्धारित 2 षटकात 8 धावा देत तीन गडी बाद केले. फिरकी गोलंदाज संतोष ताजने हा सामनावीर ठरला.

पाचवा व शेवटचा सामना हा राजपूत रॉयल्स विरुद्ध श्रीराम वारीअर्स यांच्यात खेळल्या गेला. राजपूत रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करीत 8 गडी बाद 67 धावांचे लक्ष दिले. हे लक्षाचा पाठलाग करताना महेश राठोड उर्फ बिल्ला याने धडाकेबाज खेळी करत अवघ्या 18 चेंडूत 6 चौकार ठोकत नाबाद 34 धावा कुटल्या. या सामन्यात श्रीराम संघाने 2 गडी गमावून व 1 षटक शिल्लक असताना सहज विजय मिळवला. महेश राठोड उर्फ बिल्ला हा सामनावीर ठरला.

आज होणारे सामने
1) एम ब्लास्टर विरुद्ध श्री राम वारीअर्स
2) आमेर नाईट रायडर विरुद्ध राजपूत रॉयल्स
3) जन्नत 11 विरुद्ध जय महाकाली
4) रेनबो विरुद्ध 11 टायगर रोअरिंग
5) माऊली मराठा विरुद्ध छत्रपती वारीअर्स

गुणतालिका : 
1) आमेर नाईट रायडर – 4
2) रेनबो क्रिकेट क्लब – 2
3)11 टायगर रोअरिंग -4
4) एम ब्लास्टर -1
5) जय महाकाली -3
6) राजपूत रॉयल्स -1
7) जन्नत 11 -1
8) माऊली मराठा -2
9) छत्रपती वारीअर्स -0
10) श्री राम वारीअर्स -2

सामने लाईव्ह बघण्यासाठी येथे किंवा खालील लिंकवर क्लिक करा…

हे देखील वाचा: 

मृत्यूचे तांडव: चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिकजवळ भीषण अपघात, 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

सुपरस्टार चिरंजीवीचा गॉडफादर सुजाता थिएटरमध्ये रिलिज

लष्करी इतमामात ले. कर्नल वासुदेव आवारी यांच्यावर अंत्यसंस्कार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.