वीज कोसळून मेंढपाळाचा मृत्यू; 13 शेळ्यांचाही गेला जीव

टाकळी शिवारातील दर्दैवी घटना, परिसरात शोककळा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या टाकळी येथे वीज कोसळून एका शेळक्याचा व सुमारे 11 ते 13 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विलास तुमराम (रा. टाकळी वय अंदाजे 48 ) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

 प्राप्त माहितीनुसार, विलास तुमराम हे आज दिनांक 12 जून रोजी सकाळी शेळ्या घेऊन टाकळी शेत शिवारात चराईसाठी गेले होते. दुपारी 4 वाजताच्या सुमारास आकाशात ढग दाटले व वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे विलास हे एका झाडाखाली गेले. मात्र काही वेळातच तेथे वीज कोसळली. यात विलास यांचा जागीच मृत्यू झाला तसेच चराईसाठी नेलेल्या सुमारे 13 शेळ्यांचा मृत्यू झाला. 

काही वेळाने बाजूच्या शेतात असलेल्या काही लोकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना विलास आणि काही शेळ्यांचा मृत्यू झाल्याचे कळले. त्यांनी तातडीने याची माहिती विलास यांच्या नावेवाईकांना व गावातील लोकांना दिली. लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरपूर पोलीस ठाण्याला देखील याची माहिती देण्यात आली. विलास यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.  (सदर बातमी प्राथमिक माहितीवर आधारीत असून अधिकची माहिती येताच बातमी अपडेट केली जाईल.)

Comments are closed.