‘आईटवार यांच्यावरील गुन्हे मागे घ्या’ शेतक-यांचे निवेदन

पदाचा दुरुपयोग करून खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप

0

सुशील ओझा, झरी: मुकूटबन बाजार समितीचे सचिव रमेश येल्टीवार यांनी  ७ मे रोजी शेतकरी व समाजसेवक राम शेखन्ना आईटवार यांनी कार्यालयात येऊन अश्लील शिवीगाळ केली, मारून टाकण्याची धमकी देऊन मारहाण केली अशी तक्रार मुकुटबन पोलीस स्टेशनला केली यावरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. मात्र ही तक्रार खोटी असल्याचा दावा पाटण येथील काही शेतक-यांनी केला असून याबाबत तहसीलदार गिरीज जोशी यांना निवेदन दिले आहे.

मुकूटबन बाजार समितीमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली. याकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. नोंदणीनुसार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू आहे. शेतकरी राम आईटवार यांच्या गाडीचा नंबर लागला नसल्याने  ७ मे रोज दुपारी  बाजार समिती कार्यालयात आले. व शेतकरी नोंदणी रजिस्टरची मागणी केली व  स्वतःचा गाडीचा नंबर केव्हा आहे हे पाहण्यासाठी गेले होते.

परंतु सचिव रमेश येल्टीवार त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये  अश्लील शिवीगाळ करून अंगावर धावून आले, मारहाण केली व कार्यालयातील रेकॉर्ड व ऑफिस जाळून टाकतो अशी धमकी दिली असल्याची खोटी तक्रार मुकूटबन पोलीस स्टेशनला दिली. यावरून आईटवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

सचिव येल्टीवार  यांनी केलेली तक्रार खोटी असून आईटवार हे शेतकरी आहेत. स्वतःची कापसाची गाडी सीसीआयला टाकली आहे. स्वतःच्या गाडीचा नंबर केव्हा आहे याची नोंद पाहण्याचा अधिकार त्यांना नाही का ?  नोंद पाहण्याकरिता रजिस्टर मागणे म्हणजे शासकीय कामात अडथळा होतो काय ? असा प्रश्न निवेदनात उपस्थित केला आहे.

सचिवांनी खोटी तक्रार देऊन समाजात शेकऱ्यांकरिता आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयन्त केला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात शेतकरी विठ्ठल मुत्यलवार, शेख अमजत शेख बबन, दत्ता आईटवार, युवराज सोयाम,बंडू सिद्दमवार व शेख अमीर शेख अहेमद यांची सही आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.