सुशील ओझा, झरी: राजीव विद्यालय झरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले किष्टू संटन्ना अडपावार रा. पाटण यांनी व त्यांच्या पत्नीने कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी विविध शासकीय कार्यालयात मास्कचे वाटप केले. आता पर्यंत त्यांनी 250 मास्कचे वाटप केले आहे.
अडपावार दाम्पत्यांनी हे मास्क स्वतः तयार केले असून आतापर्यंत त्यांनी तहसील कार्यालयात ५० ग्रामपंचायत व विद्युत विभाग पाटण येथे १२०, पंचायत समिती २५, आरोग्य विभाग २५, पोलीस स्टेशन पाटण २५ असे एकूण २५० कापडी मास्कचे निशुल्क वाटप केले आहे. याव्यतिरिक्त गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर तसेच भाजीविक्रेते इत्यादींना मास्क मिळावे यासाठी त्यांचे काम सुरू आहे.
बाजारात मिळणा-या मास्कपेक्षा या मास्कची जाडी अधिक असून त्यामुळे चांगले संरक्षण होते. शिवाय हे वापरल्यानंतर धुता येत असल्याने हे मास्क वापरणे अधिक सोयीचे आहे. अशी माहिती सौ आडपावार यांनी दिली. तहसीलदार जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी शिक्षक अडपावार यांनी केलेल्या कार्याचे यांच कौतुक केले आहे.