क्रीडा व कला महोत्सवात रंगली शिक्षकांची खो-खो मॅच
देवेंद्र खरबडे, वणी: विद्यार्थ्यांना कला व गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महोत्सव शिक्षकांसाठी सुद्धा व्यासपीठ ठरला आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी न राहवून शिक्षकांचा चक्क खो खो चा सामना रंगला. यात मुख्याध्यापक श्री शंकर आत्राम, क्रीडा सचिव श्री वसंतराव गोरे, चंदू परेकार, प्रेमदास डंभारे, नवेद अहेमद, विजय चव्हाण,एकनाथ लांबट, काकासाहेब जायभाये,दिगांबर ठाकरे, रविंद्र तोंडे, अविनाश तुंबडे, जयप्रकाश सूर्यवंशी व देवेंद्र खरवडे यांनी सहभाग घेतला तर मुख्याध्यापक बंडू कांबळे यांनी पंच म्हणून भूमिका पार पाडली.
नगर पालिकेच्या आंतरशालेय क्रीडा व कला महोत्सवाला 8 जानेवारी सोमवारपासून सुरूवात झाली होती. तर 12 जानेवारीला या महोत्सवाचा समारोप झाला. विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा व त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
लिंकवर क्लिक करून पाहा खोखो मॅचचा एक्सक्ल्युझिव व्हिडीओ…