सुशील ओझा, झरी: सवारीचे साहित्य चोरी प्रकरणी आरोपीस 24 तासांच्या आत अटक केल्याने पाटणचे ठाणेदार व उपनिरिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. 23 ऑक्टोबर रोजी खराबडा येथे पंजा सवारी व चोरीतील संपूर्ण साहित्य ठाणेदार अमोल बारापात्रे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे व पोलीस कर्मचारी यांनी आणून दिले. यावेळी गावक-यांनी ठाणेदार बारापात्रे उपनिरीक्षक गणेश मोरे व पोलीस कर्मचाऱ्यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. त्यावेळी पोलीस पाटील विनोद पेरकावार व अल्ताफ शेख व समस्त गाव करी हजर होते.
तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथून काही अंतरावर पंजा सवारीचा बंगला आहे. बंगल्यात सवारीचा पंजा हार व इतर साहित्य असा 40 हजाराचा मुद्देमाल होता. 12 ऑक्टोबर रोजी पांढरकवडा येथील दोन इसमाने सवारीचे दर्शन घेतो म्हणून बंगल्याची माहिती घेतली.
दुस-या दिवशी 13 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता दरम्यान सवारीचे सर्व साहित्य चोरी करून घेऊन गेले. 14 ऑक्टोबर रोज गावातील जब्बारभाई नामक व्यक्तीची पत्नी शेतात गेली व सवारीचे दर्शन घेण्यास गेली असता साहित्याच्या पेटीतून धागे बाहेर निघालेले दिसले महिलेला चोरीची शंका आली.
महिलेने गावातील जनतेला जाऊन सांगितले असता गावातील विकास हनमंतु सोपरवार यांनी जाऊन तपासणी केली. तेव्हा त्यांना पितळी पंजा किंमत 20 हजार व एक किलोचा चांदीचा चंदन हार किंमत 40 हजार असा 60 हजाराचा मुद्देमाल चोरी गेल्याचे आढळले.
सवारीचे साहित्य चोरी जाताच खरबडा गावातील 40 ते 50 महिला पुरुष ठाण्यात धडकले व चोरीचे साहित्य व आरोपी यास त्वरित अटक करा अशी मागणी केली ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकरी परत गेले. पोलिसांनी सलिम खा यासिम खा व राहुल कुनघाटकर यांच्या विरुद्ध ३८०,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच अनुषंगानेॉ तपास सुरू करण्यात आला व २४ तासांच्या आत राहुल कुनघाटकर याला पांढरकवडा येथून संपूर्ण मुद्देमालासह अटक करून पोलीस स्टेशन ला आणले. ही कार्यवाही ठाणेदार अमोल बारापात्रे सह पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे जमादार श्यामसुंदर रायके, संदीप सोप्याम ,अंजुश वाकडे, अंकुश दरबसतेवार शेख इरफान व आकाश नांनुरवार यांनी केली होती.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)