कामगारांची राहण्याची व्यवस्था कंपनीत करावी
सरपंच शंकर लाकडे यांची जिल्हाधिका-यांच्याकडे तक्रार
सुशील ओझा, झरी: मुकूटबन येथे आरसीसीपीएल कंपनीचे सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू असून फॅक्टरीत बाहेर राज्यातील कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊन मुळे फॅक्टरी एक ते दीड महिना बंद होती परंतु काही दिवसांपासून फॅक्टरी उभारण्याचे काम पूर्वरत सुरू झाले आहे. लोकडाऊन झारखंड बिहार व इतर राज्यातील हजारो कामगार आपल्या गावी परत गेले परंतु अजूनही ३० टक्के कामगार फॅक्टरीत काम करीत आहे. सिमेंट फॅक्टरीमुळे बेरोजगारांना काम मिळणार ही चांगली गोष्ट असून परप्रांतीय कामगारामुळे ग्रामवासीयांना धोका सुद्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ग्रामपंचायतने संशय व्यक्त केला आहे.
या कामगारापैकी अनेक कामगार मुकूटबन शहरात राहत असून कामगार कामावर जात असतांना सोशल डिस्टनसिंग चे पालन न करता एकाच चारचाकी वाहनातून दोन पेक्षा जास्त लोक कोंबून जात आहे. ज्यामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कंपनीच्या अधिकारी यांनी आपल्या कामगारांची राहण्याची व्यवस्था कंपनीत करावी. जेणे करून कंपनीतील परप्रांतीय कामगार गावात बिनधास्त फिरणार नाही व ग्रामवासीयांना कोणताही धोका निर्माण होणार नाही. तसेच आरसीसीपीएल कंपनीतील हजारो कामगार आपल्या गावी परत गेल्याने नवीन मजूर किंवा कामगार भरण्याची शक्यता आहे.
नवीन भरती करणाऱ्या मजुरांची व्यवस्था सुद्धा कंपनीच्या आवारात करावे. सिमेंट कंपनीचे काम सुरू झाल्यापासून बाहेर राज्यातील मोठमोठे ट्रकने जडवाहतुक करून कंपनीचे साहित्य आणत आहे.ट्रकवरील चालक व क्लीनर यांना दुर्दैवाने कोरोनाची लागण निघाल्यास संपूर्ण ग्रामवासीयांना धोका निर्माण होईल. तरी आरसीसीपीएल सिमेंट कंपनीने आपल्या स्तरावर उपाययोजना कराव्या गावकऱ्यांना धोक्यापासून दूर ठेवावे. याकरिता प्रशासनाने पुढाकार घ्यावे अशी तक्रार सरपंच शंकर लाकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.
वणी बहुगुणी आता टेलीग्रामवर आहे. आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी मिळवा.