विवेक तोटेवार, वणी: वणी–घुग्गूस मार्गावरील वर्धा नदीचा पूल जिर्ण अवस्थेत असल्याने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. २२ जून पासून ३० दिवसांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांना रहदारीस बंद करण्यात येनार आहे. त्या मार्गाने जाणा-या वाहतुकदारांसाठी पर्यायी मार्ग दिला गेला आहे. पर्यायी मार्ग हा वणी ते चारगाव चौकी – आबई फाटा – शिंदोला – मुंगोली – नकोडा घुग्गूस असा असणार आहे.
घुग्घुस ते वणी मार्गावर नवीन पूल 1985 दरम्यान बनविण्यात आला होता. मात्र आता हा पूल जिर्ण झाला आहे. पुलावरच्या अनेक ठिकाणी सळाखी निघाल्या होत्या. या पुलावरून जाणा-यांना तारेवरची कसरत करावी लागत होती, या रस्त्यावरून दिवस-रात्र चंद्रपुर, कोरपना, यवतमाळ ते मुबंई पर्यंत छोटी मोठी वाहने जातात. या पुलावरील सळाखी बाहेर निघाल्यामुळे छोट्या -मोठ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच वाहनेही पंचर व्हायची.
वणी ते घुग्घूस रस्त्यावरील वर्धा नदीच्या पुलाचे काम करणे असल्याने व सदरचे काम संपूर्ण वाहतुक बंद केल्याखेरीज करणे शक्य नसल्याचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग – 1, चंद्रपूर यांनी सदर रस्त्याची वाहतुक बंद करुन पर्यायी रस्त्याने वळविण्याबाबत विनंती केली आहे.
डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपुर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम – १९५१ च्या कलम -३३ (१) (ब) अन्वये कायदेशीर अधिकारान्वये जनतेला धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होवु नये याकरीता प्रमुख राज्य मार्ग क्रमांक 14 वणी – घुग्गूस मार्गावरील वर्धा नदीच्या पुलाचे काम करणे असल्याने सदर रस्ता दि. २२ जून पासुन ३० दिवसांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांना रहदारीस बंद करण्यात येनार आहे. वाहतुकदारांनी खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे जनतेला निर्देश देण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग घुग्घूस – नकोडा – मुंगोली – शिंदोला – आबई फाटा – चारगाव चौकी ते वणी, पर्यायी मार्ग ताडाळी – घोडपेठ – भद्रावती – कोंढा – माजरी – पाटाळा ते वणी, पर्यायी मार्ग घुग्घूस – ताडाली – भद्रावती – वरोरा – वणी.
सदर अधिसूचना दि.२२ जून पासुन ३० दिवसांपर्यंत या मार्गाने वाहतुक सुरु राहिल.