सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील खंड १ व २ येथील अनेक शेतक-यांच्या शेतात जाण्याकरीता रस्ता नसल्याने त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. शेतात बैलबंड़ी जात नसल्याने अनेक शेकर्यांना शेतातील पिकाल खताचा पुरवठा होत नाही. सोबतच अनेक लोकांनी पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये- जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पांदण रस्ता जनु नाल्याचे रूप आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून ये जा करावी लागते.
अडेगाव येथील पांदण रस्ताचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वात गावातील अनेक महिलांनी तहसिलदारांना निवेदन देऊन रस्ताची मागणी केली व मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणचा इशारा सुद्धा दिला. या सोबतच कोरोना आपत्त्ती काळात अनेक निराधार प्रकरणे प्रलंबित निकाली त्वरित काढ़ासाठी देखील निवेदन देण्यात आले.