कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस उपलब्धच नाही

सव्वा महिना लोटला तरी दुसरा डोस नाही

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जवळपास 900 लोकांनी कोवॅक्सिन घेऊन सव्वा महिना लोटला आहे. सदर लस ही 28 दिवसांनी घेणे गरजेचे आहे. मात्र अद्याप त्यांना डोस मिळालाच नाही. कोवॅक्सिन लस तालुक्यात उपलब्ध नसल्याने लस घेतलेले नागरिक अस्वस्थ झाले आहे. सध्या त्यांच्या दुस-या डोससाठी चकरा सुरू आहे.

कोवॅक्सिन या लशीचा पहिला डोज 16 ते 18 एप्रिलच्या दरम्यान सुमारे 900 लोकांनी घेतला. मात्र अद्याप सव्वा महिना लोटला तरी त्यांना दुसरा डोस मिळालेला नाही. दुसरा डोज उशिरा मिळाल्याने लसीचा उपयोग होणार की नाही अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम याना विचारणा केली असता संपूर्ण जिल्ह्यात कोवॅक्सिन लस चा तुटवडा असून जिल्ह्यात कोवॅक्सिन लस उपलब्ध झाल्यास झरी तालुक्यात ती उपलब्ध होणार आहे. तालुक्याकरिता आपण मागणी आहे. तालुक्याकरिता 900 डोजेसची आवश्यकता आहे. लस उपलब्ध होताच 600 ते 700 डोजची मागणी केली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी यासाठी समाजसेवक मंगेश पाचभाई यांनी निवेदनातून मागणी केली आहे.

एकाच वॅक्सिनचा दुसरा डोस घ्यावा: डॉ. मोहन गेडाम
ज्या व्यक्तींनी कोवॅक्सिनचा पहिला डोज घेतला आहे त्यांनी दुसराही डोज कोवॅक्सिनचाच घ्यावा. मात्र पहिला डोस कोवॅक्सिनचा घेतला व दुसरा डोस कोविशिल्डचा घेतल्यास शरीरावर त्याचा साईड इफेक्ट् होऊ शकतो. ऍलर्जी व इतर कोणतेही इफेक्ट होऊन माणूस दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या वॅक्सिनचा डोस घेऊ नये.
: डॉ मोहन गेडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी

हे देखील वाचा:

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

आज तालुक्यात कोरोनाचे 21 रुग्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.