जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरात सुरु सेक्स रॅकेट बाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहे. ऑनलाइन देह व्यापार सोबत या धंद्यातील काही तरुणींनी ‘ब्लॅकमेलिंग’ चा जोडधंदा सुरु केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. शहरातील अनेक मालदार आसामी या रॅकेटच्या जाळ्यात अडकून लाखों रुपयाने लुबाडले गेल्याची चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरु आहे. दरम्यान ‘वणी बहुगुणी’ने शहरातील सेक्स रॅकेटबाबत सिरिज सुरू केल्यानंतर सेक्स रॅकेट चालकांचे धाबे दणाणले आहे. व्हॉट्सऍप स्टेटसद्वारा कॉलगर्लची माहिती देणे दोन तीन दिवसांपासून बंद झाल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’ला मिळाली आहे.
लव्ह, सेक्स आणि धोकाच्या व्यवसायात तरबेज काही सेक्स वर्कर टार्गेट सोबत मैत्री करून आपत्तीजनक व्हिडीओ व कॉल रेकॉर्डिंग तयार करून घेतात. त्याद्वारे ग्राहकाला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जाते. महत्वाची बाब म्हणजे पैसे न देणाऱ्या ग्राहकाला दुष्कर्माच्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली जाते. बदनामी आणि भीतीपोटी बहुतांश ग्राहक सेटलमेंट करून घेत असल्याचीही माहिती आहे.
वणी शहरात जिगोलो?
पाश्चात्य देशांमध्ये तसेच देशातही अनेक महानगरांमध्ये महिला सेक्स वर्कर प्रमाणे पुरुष सेक्स वर्कर (जिगालो) देह व्यवसाय करतात. मात्र वणी सारख्या शहरात काही तरुण जिगालो म्हणून सेक्स सेवा पुरवीत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जिगोलोसाठी क्लबचे मेंबर बनणे गरजेचे असते. याला एन्टरटेन्मेंट क्लब असे गोंडस नाव दिले गेले आहे. यात महिला यांना प्रत्येक विसिटला जिगोलोची सेवा घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. तर सेवा देणा-या जिगोलोला वन टाईम मेंबरशिप घ्यावी लागते. मेंबरशिप घेतल्यावर जिगोलोला क्लबचे कार्ड दिले जाते. त्यानंतर महिलेच्या त्यांच्या मागणी व गरजेनुसार जिगोलो पुरवले जातात.
शहरात 3 जिगोलो?
वणी शहरात धिप्पाड, स्मार्ट असलेल्या 3 जिगोलोने क्लबमध्ये रजिस्ट्रेशन केल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’जवळ आहे. शहरातील एका प्रतिष्ठीत घरातील महिलेने 15 हजार रुपये देऊन त्या पुरुषाकडून सेवा घेतली असल्याचीही चर्चा आहे. महिलेकडून घेतलेल्या पैशातील काही टक्के रक्कम हे एन्टरटेन्मेंट क्लब घेतात तर जिगोलोला त्याचे सेवा शुल्क दिले जाते. हे क्लब नागपूर, मुंबई, पुणे अशा मेट्रो शहरातून ऑपरेट होते.
शहरात विविध ठिकाणी देह विक्री पॉईंट असूनही “उंचे लोग- उंची पसंद” असलेली काही ‘दैव’ मंडळीला विकेंडला नागपूर वारी केल्याशिवाय समाधान वाटत नसल्याचेही बोलले जाते. नागपुर येथील एजंटच्या माध्यमातून सदर भागात एका हॉटेलमध्ये या मंडळीला सर्व सेवा पुरविली जाते.
‘त्या’ दोघांची चौकशी कधी?
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची सध्या शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे. अनेक जण एकमेकांकडे या क्लिपची मागणी करीत असल्याची माहिती मिळाली आहे. प्रतिष्ठीत व्यक्तींचे काळे कारनामे बाहेर आल्याने संतापही व्यक्त केला जात आहे. या क्लिपमध्ये सेक्स रॅकेट चालवणा-यांचा तसेच शहरातील कॉलगर्लचा उल्लेख आहे. मात्र पोलीस प्रशासनातर्फे अद्यापही या दोन असामींची चौकशी करण्यात आलेली नाही. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यास या रेक्स रॅकेटचा भांडाफोड होण्यास मोठी मदत होऊ शकते. मात्र अद्यापही यावर कोणतीही कार्यवाही पोलिसांद्वारे करण्यात आलेली नाही.
सांस्कृतिक व साहित्य नगरी म्हणून परिचित वणी शहराला गालबोट लावणाऱ्या असे गैर कृत्यांबाबत पोलीस प्रशासन व नागरिकांना माहिती पुरविण्याचा एक छोटासा प्रयत्न ‘वणी बहुगुणी’ने केला आहे. सेक्स रॅकेटचे पाळंमुळं शोधून काढण्याची अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहे. या अश्लील संस्कृतीला शहरातून हद्दपार करण्यासाठी पोलीस, प्रशासन व लोकप्रतिनिधी पुढे काय कारवाई करतात? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमश:
हे देखील वाचा:
सेक्स रॅकेटचे पाळंमुळं शोधून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान (भाग 3)