खर्रा घोटत असताना ब्राह्मणी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

4 दिवसांआधीच मिळाली नोकरी आणि काळाचा घाला...

1

विवेक तोटेवर, वणी: तालुक्यातील ब्राह्मणी येथे आज शुक्रवार दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान खर्रा खोटताना एका 16 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. समीर विलास काळे असे मृतकाचे नाव आहे. खर्रा घोटण्याच्या मशिनचा करंट लागल्याने हि दुर्दैवी घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Podar School 2025

सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक अडचणीत आहेत. ब्राह्मणी येथील रहिवाशी असलेला समीर विलास काळे (16) हा देखील छोटे मोठे काम करून घरी आधार द्यायचा. मात्र लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने तो कामाच्या शोधात होता. 4 ते 5 दिवसांआधी त्याला गावातील एका पान ठेल्यामध्ये मशिनवर खर्रा घोटण्याचे काम मिळाले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आज शुक्रवारी दिनांक 4 जून रोजी समीर खर्रा घोटत असताना अचानक खाली पडला. पानठेला चालकांने याची माहिती त्याच्या काकाला दिली. ते तातडीने घटनास्थळी पोहचले व त्यांनी समीरला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण स्पष्ट नसले तरी समीरचा मृत्यू करंट लागल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. 

हे  देखील वाचा:

गणेशपूर येथे सुरक्षा गार्डची गळफास घेऊन आत्महत्या

सलग दुस-या दिवशी तालुक्यातील रुग्णसंख्या शुन्य

Leave A Reply

Your email address will not be published.