राजूर (कॉ) मध्ये मध्यरात्री पुन्हा घरफोडी, शेजारी ओरडल्यानंतर चोर फरार

18 हजारांचे दागिन्यांवर डल्ला, राजूर कॉलरीत घरफोड्याचे सत्र सुरू

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री घरफोडी करून दागदागिने लंपास केले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांनी सुमारे 18 हजारांचे दागदागिने चोरी केले. या घटनेच्या दोन तीन दिवसांआधीच चोरट्यांनी एक बंद घर फोडून धाडसी चोरी केली होती. 

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी शब्बीर अहेमद स्थगित अहेमद हे राजूर कॉलरी येथील रहिवाशी आहेत. त्यांची मुलगी त्यांच्या घरी पाहुणी म्हणून आली होती. शनिवारी रात्री 1.30 ते 2 वाजताच्या शब्बीर यांच्या शेजा-यांना शब्बीर यांच्या घराजवळ काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यांनी बघितले असता त्यांना चोर पळताना दिसला. त्यांनी त्वरित चोर चोर म्हणून आरडाओरड केला.  मात्र चोर पळून गेले.

दरम्यान शब्बीर देखील उठले. त्यांनी घर तपासले असता त्यांना घरातील खुंटीला लटकवलेल्या पर्समधून सोन्या चांदिचे दागिने लंपास झाल्याचे आढळून आले. शब्बीर यांची मुलगी त्यांच्या घरी आली होती. तिने पर्समध्ये दागदागिने ठेवले होते. त्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. शब्बीर यांनी पोलीस स्टेशन गाठून अज्ञात आरोपीविराधात तक्रार दाखल केली. या चोरीत चांदीचे पैंजण, मणी, मंगळसूत्र असा एकूण 18 हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भादंविच्या कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. विशेष म्हणजे राजूर कॉलरी येथे दोन तीन दिवसांआधीच चोरट्यांनी लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या एका व्यक्तीचे घर चोरट्यांनी फोडले होते. यात सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. सततच्या चोरीच्या घटनेमुळे नागरिक दहशतीत आले आहे.

हे देखील वाचा:

शेतात काम करणा-या महिलेवर वीज कोसळल्याने मृत्यू

Leave A Reply

Your email address will not be published.