चोरट्यांनी फोडले शॉपिंग कॉम्प्लेक्स, रोख रक्कम लंपास

चोरी उघडकीस येऊ नये म्हणून सीसीटीव्हीच्या डीव्हीआर बॉक्सवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा येथे चोरट्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स फोडले. यात चोरट्यांनी रोख रक्कम व सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स लंपास केला. या प्रकरणी चोरट्यांनी ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमे-याची नासधूस केली, तसेच रेकॉर्डींग असलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स चोरून नेला. असा प्रकार पहिल्यांदाचा परिसरात घडला आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, प्रवीण पांडुरंग नवले (36) हे नांदेपेरा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मालकीचे स्टेट बँकेजवळ साईकृपा नावाने कॉम्प्लेक्स आहे. तिथे चार दुकाने आहेत. यातील साईकृपा नामक किराणा मालाचे दुकान ते सांभाळतात. तर गॅस एजन्सी, सेतू केंद्र, पान टपरी, मोबाईल रिचार्ज असे वेगवेगळे त्यांचा भाऊ व परिचित चालवतात. या सर्व दुकानाचा गल्ला एकत्रीत गोळा होतो. हा गल्ला ते किराणा मालाच्या दुकानातच ठेवतात.

शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी रात्री 8 वाजता सर्व दुकान बंद करून ते घरी गेले होते. त्यावेळी दुकानाच्या गल्ल्यात 25,900 रुपये ठेवले होते. सकाळी प्रवीणचा भाऊ हे पानटपरी उघडण्यासाठी गेले असता त्यांना सर्व दुकानाचे शटरचे कुलूप तुटलेले आढळले. दुकानापुढे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला तुटलेले आढळले. त्यांनी याची माहिती तात्काळ त्यांचा भाऊ प्रवीण यांना दिली. प्रवीण हे दुकानात गेले असता त्यांना गल्ल्यातील 25900 रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स देखील चोरून नेल्याचे आढळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रवीण यांनी वणी पोलीस स्टेशन गाठले. या चोरीत त्यांच्या दुकानातील रोख रक्कम व डीव्हीआर बॉक्स असा एकूण 29900 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भा.न्या.सं. च्या कलम 305 (अ) व 331 (4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. वणी पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.

Comments are closed.