“लॉकडाउन” काळात इंदिरा सूतगिरणीचे ‘लॉक” तोडून चोरी

अज्ञात चोरट्यानी लांबविले 25 हजारांचे साहित्य

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मुकुटबन मार्गावर पेटूर गाव शिवारात निर्माणाधीन सूतगिरणी कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी 25 हजाराचे साहित्य चोरी केल्याची घटना 9 जून रोजी उघडकीस आली. लॉकडाउनच्या कालावधीत चोरट्यानी बेवारस असलेली इंदिरा सहकारी सूतगिरणीचे लॉक फोडून चोरी केल्याचा अंदाज आहे.

प्राप्त माहितीनुसार वणी विधानसभेचे तत्कालीन आमदार वामनराव कासावार यांनी 30 वर्षांपूर्वी इंदिरा सहकारी सूतगिरणीची आधारशिला ठेवली होती. मात्र 20 वर्षांची त्यांची कारकिर्दीत सूतगिरणी सुरू होऊ शकली नाही. करोडो रुपये खर्च करून अर्धवट बांधलेली भव्य इमारत मागील पाच वर्षांपासून बेवारस स्थितीत पडून आहे. पगार मिळाली नसल्यामुळे चौकीदार व सुपरवायझरसुद्दा सूतगिरणीकडे फिरकत नाही.

नेमके याच स्थितीचा फायदा घेऊन चोरट्यानी सूतगिरणीच्या खिडक्यांची ग्रील तोडून इलेक्ट्रिक केबल, तार बंडल, सोलर प्लेट, लोखंडी सलाख व इतर साहित्य लंपास केले. सूतगिरणीचे सुपरवायझर प्रफुल उपरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्द कलम 379, 427 अनव्ये गुन्हा दाखल करून तपास सुरु केली आहे.

हे देखील वाचा:

चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या

शेतातून पाटस-याचे चुकीच्या पद्धतीने खोदकाम

Leave A Reply

Your email address will not be published.