महागाई व शेतक-यांच्या प्रश्नांवर 17 जूनला वणीत निदर्शने आंदोलन

माकप व किसान सभेचे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

0

जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र किसान सभेतर्फे गुरुवारी दिनांक 17 जून रोजी निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. महागाई, कृषी कायदा, कामगार व जनविरोधी धोरणाविरुद्ध हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माकप व किसान सभेची नुकतीच ९ जून रोजी वणी येथील विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत निदर्शने आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.

दिल्ली येथे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय रूपाने किसान सभा कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहे, असे असतानाही मोदी भाजपची केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या घशात घालणारा कायदा रद्द करायला तयार नाही. देशातील एकूण लोकसंख्येच्या ६०% असलेल्या शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ह्या मोदी सरकारला १% भांडवलंदारांचे हित महत्वाचे वाटते. यामुळेच मोदी सरकारने शेतकाऱ्यांसोबत चर्चेची दरवाजे सुद्धा बंद करून ठेवले आहे.

मोदी सरकारने डिझेल, पेट्रोल, बी, बियाणे, खते, कीटकनाशके, गॅस ह्यावरील सबसिडी संपवून प्रचंड महागाई च्या खाईत देशातील जनतेला ढकलले आहे. ह्या करिताच यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे माकप व किसान सभेच्या संयुक्त विद्यमाने मोदी सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर निदर्शने आंदोलन दि. १७ जून ला करण्यात येत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या निदर्शने आंदोलनात सहभागी होण्याचे कॉ. शंकरराव दानव, कॉ.कुमार मोहरमपुरी, कॉ. चंद्रशेखर सिडाम, कॉ.दिलीप परचाके, कॉ. खुशालराव सोयाम, कॉ. सुधाकर सोनटक्के, कॉ. मनोज काळे, कॉ.नंदू बोबडे, कॉ.अर्जुन शेडमाके, कॉ. कवडू चांदेकर इत्यादिंनी आवाहन केले आहे.

हे देखील वाचा:

चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या

शेतातून पाटस-याचे चुकीच्या पद्धतीने खोदकाम

Leave A Reply

Your email address will not be published.