दुचाकी चोरीचे सत्र सुरुच, घरासमोर ठेवलेली दुचाकी लंपास

गोकुळनगर येथील घटना, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुळनगर परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. किसन बालाजी सोळुंके (24) हे शहरातील गोकुळनगर परिसरात राहतात. त्यांनी दोन वर्षाआधी हिरो होंडा शाईन (MH29 BX2766) 125 सीसी ही नवीन दुचाकी विकत घेतली होती. 15 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे संध्याकाळी त्यांनी आपली दुचाकी घरासमोर ठेवली. रात्री 12 पर्यंत दुचाकी तेथेच होती. त्यानंतर रात्री 3 वाजताच्या ते लघुशंकेसाठी उठले असता त्यांना ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी आढळली आली नाही. किसन यांनी रात्रीच आजूबाजूला शोध घेतला. दुस-या दिवशी संपूर्ण शहरात दुचाकीचा शोध घेतला. परंतु गाडीचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी 17 ऑगस्ट रोजी वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.