खासगी ट्युशन, शाळेला पुरवण्यात येणार ऑनलाईन क्लासचे टुल्स

देनवेअर लॅब नागपूरतर्फे वर्च्युअल क्लास सेवा सुरू

0

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनामुळे शाळा, कॉलेज यासह खासगी ट्युशनदेखील बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान होऊ नये यासाठी नागपूर येथील कंपनी THENWARE LABS सरसावली आहे. या कंपनीद्वारा शाळा आणि खासगी ट्युशनला ऑनलाईन एज्युकेशन व वर्च्युअल क्लाससाठी आवश्यक असणा-या सर्व टुल्सची सेवा पुरवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याला आळा बसू शकतो.

या कंपनीद्वारा दिल्या जाणा-या टुल्सद्वारा शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सोयिस्कर होणार आहे. या सेवेत व्हाईटबोर्ड, ऑनलाईन असाइनमेन्ट इत्यादींचा समावेश आहे. हे टुल्स तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याने याद्वारा शाळेत किंवा क्लासमध्ये शिकवण्याच्या व ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतीत कोणताही फरक पडणार नाही. विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांच्या वेळेनुसार क्लासचा वेळ ठरवता येणार. यात शिक्षक व पालक यांच्या पॅरेन्ट मिटिंगचीही सुविधा दिली गेली आहे. याशिवाय पालकांना शिक्षकांच्या थेट संपर्कात राहता येणार आहे. पालकांना शिकवणीबाबत काही समस्या असल्यास त्याबाबतही शिक्षकांना संपर्क साधता येणार आहे. या टुल्समध्ये लाईव्ह सेशनही सेवा आहे.

THENWARE LABS नागपूर या कंपनीद्वारा विविध ट्रेनिंग टुल्सच्या सेवेसह, डिजिटल मार्केटिंग, प्रोफेशनल सोशल मीडिया हॅन्डलिंग, वेब डिझायनिंग, मोबाईल ऍप मेकिंग, ग्राफिक डिझायनिंग, यासह तांत्रिक सल्ला ही दिला जातो. शाळा, कॉलेज, खासगी ट्युशन क्लास यांना ही सेवा हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे ही कंपनी मुळच्या वणीतील एका आयटी एस्पपर्टद्वारा चालवली जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क – 9561110897, 9096085786
Email Address: [email protected] / [email protected]
Website: www.thenwarelabs.com

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.