जितेंद्र कोठारी, वणी : सोफ्यावर ठेवलेली लॅपटॉप अज्ञात इसमानी खिडकीतून हात टाकून लंपास केल्याची घटना 21 ऑगस्टला उघडकीस आली. याबाबत स्वप्नील विलास गहुकर यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. अलीकडे भुरट्या चोरींच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे झाले आहे.
फिर्यादी स्वप्नील गहुकर (29) हे वणी येथील बजाज फायनान्स कार्यालयात मॅनेजर पदावर कार्यरत आहे. ऑफिस कामाकरीता कंपनीतर्फे त्यांना लॅपटॉप देण्यात आला आहे. दि. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी ऑफिस बंद झाल्यावर फिर्यादी नगर परिषद शाळा क्र.4 समोर आपल्या घरी आले. नेहमीप्रमाणे सोफ्यावर लॅपटॉपची बॅग ठेवून गहुकर हे कुटुंबासह जेवण करून झोपी गेले.
सकाळी उठून बघितले असता लॅपटॉपची खाली बॅग व पन्नी सोफ्याखाली पडून दिसली. बॅग मध्ये पाहिले असता त्यात लेनोवो कंपनीचा लॅपटॉप खिडकीतून हात टाकून लंपास केल्याचे लक्षात आले. ज्याची किंमत अंदाजे 20 हजार आहे. स्वप्नील गहुकर यांच्या फिर्यादवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
अलीकडे शहरात भुरट्या चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे. अनेकांचे खिडकीत ठेवलेले मोबाईल याआधी चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी तर सावध राहणे गरजेचे आहे शिवाय पोलिसांनी या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.