चोरट्यांचा थेट मंदिरावरच डल्ला, फोडली दानपेटी

आज सकाळी उघडकीस आली घटना

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे बुधवार 3 मार्च रात्री 11 वाजताच्या सुमारास हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली. त्यातून अज्ञात चोरट्याने 1700 ते 1800 रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे.

Podar School 2025

नवीन वागदरा येथे हनुमान मंदिर आहे. आज गुरुवारी सकाळी मंदिरा शेजारी राहणा-या लोकांना मंदिराची दानपेटी फोडलेली दिसली. याबाबतची माहिती बाबा सीताराम ठावरी यांना मिळताच त्यांनी गुरुवारी सकाळी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मंदिराजवळ रात्री गावकरी होते. त्यामुळे रात्री 11.30 ते सकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान फोडली असल्याचा अंदाज आहे. या दानपेटीतून अंदाजे 1700 ते 1800 रुपये चोरून नेले. घटनेचा प्राथमिक तपास विठ्ठल बुरेवार करीत आहे.

हे देखील वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.