वणीत होणार पहिल्यांदाच स्टॉक मार्केट प्रशिक्षण शिबिर

सुप्रसिद्ध ट्रेनर प्रसाद जोशी यांचे बाजोरिया लॉनमध्ये एक दिवशीय शिबिर

सुरेश पाचभाई: वणीत स्टॉक मार्केट संंबंधी एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेअर मार्केटमध्ये कमीत कमी धोका पत्करून जास्तीत जास्त नफा कसा कमवावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. रविवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी शहरातील बाजोरिया लॉन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 11 ते 5 या वेळेत हे शिबिर घेतले जाणार आहे. सुप्रसिद्ध स्टॉक मार्केट एक्सपर्ट व ट्रेनर प्रसाद जोशी हे उपस्थित शिबिरार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे. इनव्हेस्टलिटीक फायनान्शीअल सर्विसेसद्वारा या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

लॉकडाऊन नंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणा-यांची कित्येक पटीने वाढली आहे. अनेकांनी यात पैसे देखील गुंतवले आहे. सध्या सेन्सेक्स 60 हजारांच्या पार गेला आहे. मार्केट सध्या चांगले असल्याने यात नफा कमवण्याची संधी वाढली आहे. अनेकांची स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असते. मात्र पुरेसे ज्ञान नसल्याने त्यांना स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन वणीमध्ये इनव्हेस्टलिटीक फायनान्शीअल सर्विसेस द्वारा एक दिवशीय स्टॉक मार्केट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरात काय शिकवले जाणार?
स्टॉक मार्केट म्हणजे काय? स्टॉक मार्केट कशा पद्धतीने काम करते. सनसेक्स, निफ्टी काय आहे? आयपीओची संपूर्ण माहिती. ट्रेड कसा करावा तसेच तो कसा चेक करावा? सेकंडरी मार्केट म्हणजे काय? लिमिट ऑर्डर, सर्किट इत्यादी टर्म काय आहेत? राईट, बोनस, बाय बॅक इश्यू याचा हे काय आहे? स्टॉक स्प्लिट म्हणजे काय? स्प्लिट आणि बोनस यामध्ये काय फरक आहे? मर्जर व डी मर्जर. डिमेट अकाउंट व ट्रेडिंग अकाउंट यामध्ये काय फरक आहे? पोर्टफोलियो कसा बनवावा? म्युच्युअल फंड काय आहे? ब्रोकर कसा निवडावा आणि विशेष म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुतवण्याच्या काही सिक्रेट टीप्सही या प्रशिक्षणात दिल्या जाणार आहे.

प्रशिक्षक प्रसाद जोशी हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध शेअर मार्केट एक्सपर्ट व ट्रेनर आहेत. 1997 पासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी 500 पेक्षा अधिक विद्याथ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच क्वोरा या प्लॅटफॉर्मवरही ते नेहमी गाईड करीत असतात. क्वोरावर त्यांचे 12 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर असून त्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांचे प्रश्न व शंकेचे निराकरण करतात.

या शिबिरासाठी ऍडव्हान्स बुकिंग केल्यास अवघे 499 रुपये फिस आकारली जाणार आहे. मात्र स्पॉट बुकिंग केल्यास आपल्याला 699 रुपये फिस भरावी लागणार आहे. त्यामुळे आधीच बुकींग करावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सदर शिबिर हे इनव्हेस्टिलिटिक फायनान्स सर्विस द्वारा आयोजित करण्यात आले ही फर्म पुणे आणि नागपूर येथे फायनान्स संबंधी सेवा पुरवते. विशेष म्हणजे मुळचे वणीचे असलेले रोहीत काकडे हे या फर्मचे संचालक आहे.

फिस रिकव्हर करून देण्याची हमी- रोहित काकडे
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अनेक लोक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करीत आहेत. मात्र शहराच्या मानाने ही संख्या अत्यल्प आहे. अनेकांना या क्षेत्रात यायचे आहे. मात्र अपु-या ज्ञानामुळे ते इथे येत नाही. तर अनेकांनी शेअर मार्केटचे कोणतेही ज्ञान नसताना गुंतवणूक केल्याने अनेकांना नुकसानही सोसावे लागले. सध्या सेन्सेक्स वाढत असल्याने ही गुंतवणुकीची योग्य वेळ आहे. जर प्रशिक्षण घेऊन व थोडे ज्ञान घेऊन गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे जी फिस आम्ही आकारली आहे. ती फिसची रक्कम शेअर मार्केटमधूनच रिकव्हर करून देण्याची हमी देखील आम्ही घेत आहोत.
– रोहित काकडे, संचालक इन्व्हेस्टिलिटिक फायनान्शीअल सर्विसेस

शहरात पहिल्यांदाच स्टॉक मार्केट संबंधी प्रशिक्षण होणार असून हे शिबिर मराठीमध्ये होणार आहे. त्यामुळे वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
रजिस्ट्रेशनसाठी संपर्क – निखिल भोयर 9823160229
अधिक माहितीसाठी संपर्क – रोहित काकडे 7743906960

Comments are closed.