अश्लिल फोटो तयार करून व्हायरल करण्याची धमकी

महिलेला मागितली 2.5 लाखांची खंडणी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: एक अनोखळी कॉल.. कॉलवरून दोघांत मैत्री… मात्र नंतर पैशाची मागणी… फोटो मॉर्फ करण्याची धमकी… पैसे न दिल्यास बदनामीची धमकी… ब्लॅकमेलिंगने महिला हादरली. अखेर फोटो मॉर्फ करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडिता ही 40 वर्षांची असून ती नोकरी करते. ती वणीत आपल्या कुटुंबासोबत राहते. वर्षभराआधी त्यांना एक अननोन नंबरवरून 30 वर्षीय तरुणाचा कॉल आला. तो पीडित महिलेला तिचा नातेवाईक असल्याचे बोलला. मात्र तिने ओळखत नसल्याचे सांगितले. त्यानंतर तो महिलेला नेहमी कॉल करीत होता. दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. त्यांच्यात सातत्याने फोनवर बोलणे सुरु झाले.

एके दिवशी तरुणाने कॉल करीत महिलेला अडीच लाखांची मागणी केली. त्यावर पीडित महिलेने तिच्याकडे एवढे पैसे नाही, असे सांगत पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. पैसे मागितल्याने पीडित महिलेने आरोपी तरुणाशी बोलणे सोडले. तीन दिवसांआधी गुरुवारी संध्याकाळी तरुणाचा पुन्हा महिलेला कॉल आला. तेव्हा त्याने महिलेला तिचे फोटो मॉर्फ करून (एडीट करून) अश्लिल फोटो तयार करणार. हे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करणार, अशी धमकी दिली.

जर बदनामी टाळायची असेल तर अडीच लाख दे, अशी मागणी त्याने महिलेला केली. हे ऐकूण महिलेला जबर धक्का बसला. तिने तातडीने वणी पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 308 (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे करीत आहे.

वाढदिवसाच्या दिवशीच विवाहित तरुणाची आत्महत्या

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.