अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन येणाऱ्या हिरापूर येथील पैनगंगा नदीच्या पत्रातून हिरापूर पांदण रस्त्याने तीन ट्रॅक्टर रेती चोरी करून ट्रॅक्टर भरून मांगलीकडे येत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार गुलाब वाघ यांना १६ मेला सायंकाळी ६.३० वाजता पेट्रोलीग करताना मिळाली. यावरून ठाणेदार यांनी आपली पोलीस गाडी हिरापूर पांदण रस्त्याकडे वळवली असता तीन ट्रॅक्टर रेतीने भरून येत असलेले ट्रॅक्टर आढळले. ट्रॅक्टर अडवून तिनही चालकांना विचारपूस केली असता रेती चोरीची आढळली तसेच ट्रॅक्टर चालकांजवळ परवाना सुद्धा नव्हता.
तिनही ट्रॅक्टर मिळून साडे चार ब्रास रेती किंमत ९ हजार व ट्रॅक्टर किंमत १० लाख असा एकूण १० लाख ९ हजारांची रेती व ट्रॅक्टर जप्त करून आरोपी सचिन विठ्ठल पाईलवार राहणार हिरापूर, उमेश रामचंद्र जुनघरी , कैलास नागोराव कोटनाके दोघे रा. मांगली याना अटक करून यांच्यावर चोरीच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही ठाणेदार गुलाब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रवीण ताडकोकुलवार, पुरोसोत्तम घोडाम, संदीप सोयाम, स्वप्नील बेलखेडे यांनी केली.
तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असून याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रेती तस्करीत तालुक्यातील राजकीय लोकाची चालती असून काही राजकीय पुढारीच सदर रेती तस्करी करीत आहे. ट्रॅक्टर वर कार्यवाही करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला एक गावपुढारी धमकी देतो की तुम्हाला नोकरी करायची आहे की नाही, तुम्हाला बडतर्फ करायला लावतो असे बोलून धमकावतो ज्यामुळे परिसरातून सर्रास रेती तस्करी सरु आहे.