वाघाचा थरार, गुराखी चढला जीव वाचवण्यासाठी झाडावर

वाघाच्या हल्यात रोह्याचे पिलू ठार, कुत्रा जखमी

0

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील कोलगाव  कोळसा खाण परिसरात वाघाने रोह्याच्या पिलाला ठार मारल्याची घटना २४ सप्टेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेमुळे शिंदोला परिसरात वाघांचा वावर असल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे.

२४ सप्टेंबरला कोलगाव कोळसा खाणी लगत टाकळी (चिखली) येथील रहिवासी प्रशांत रत्नाकर मडावी हा २३ वर्षीय युवक स्वमालकीची जनावरे चारत होता. खाण परिसरात आस्ट्रेलियन बाभळीच्या झुडुपात जनावरे चरत असताना वाघाने हल्ला केला. जनावरे सैरावैरा पळू लागली. प्रशांतही घाबरून झाडावर चढला. मोठमोठ्याने मदतीसाठी ओरडू लागला. लगतच्या शेतातील लोकानी घटनास्थळाकडे धाव घेतली.

प्रशांत झाडावरून खाली उतरला. घडल्या प्रकारची माहिती दिली. युवकानी घटनास्थळी शहानिशा केली असता रोह्याचे पिल्लू वाघाच्या हल्यात ठार झाल्याचे दिसून आले. लगतच्या अमोल गुप्ता यांच्या शेतातील कुत्र्याला देखील वाघाने जखमी केल्याचे दिसून आले. घटनास्थळी वाघाच्या पंजाचे ठसे आढळुनआली.

सदर घटनेची पाहणी करण्यासाठी वनाधिकारी वालकोंडावर यांच्यासह वनकर्मचारी घटना परिसरात गेले. मात्र अंधार झाल्यामुळे परत आले. २५ सप्टेंबरला सदर प्रकारची चौकशी करण्यात येणार आहे. परंतु घटनास्थळी दिसून आलेली पंजाचे ठसे हे बिबट्याची असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधी जवळ वनाधिकारी एम. आर. वालकोंडावर यांनी सांगितले.

वाघाच्या पायाचे ठसे

विशेष म्हणजे कुर्ली बंदीत आणि चिखली शिवारात वाघाच्या पंजाचे ठसे नुकतेच आढळून आले होते. सहा महिन्यांपूर्वी येनक येथील एका शेतात बिबट मृतावस्थेत आढळला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.