सावधान… वाघोबा आलाये… सराटी-खैरगाव फाट्यावर दर्शन
वनविभागाचा अलर्ट, परिसरात दहशतीचे वातावरण
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोटोणी शिवारातील सराटी-खैरगाव (भेदी) दिशेने जाणाऱ्या फाट्यावर आज शनिवारी दिनांक 26 सप्टेंबरला 12 वाजता दरम्यान रस्त्याने येजा करणा-यांना हिरव्यागार गवतात एक भला मोठा वाघ बस्तान मांडुन दिसला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वन परिक्षेत्र मारेगाव हद्दीतील बोटोनी (चि) परिसर हा घनदाट जंगल क्षेत्राने व्यापलेला आहे. मागील काही दिवसांपासून जंगलात वाघाचे दर्शन अनेक शेतक-यांना झाले. अश्यातच आज 12 वाजताच्या दरम्यान खैरगाव (भेदी) दिशेने जाणाऱ्या फाट्याजवळ गवताच्या झुडपात एक वाघ बस्थान मांडून होता. लोकांनी याबाबत तात्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने सर्चिंग ऑपरेशन सुरू केले.
बोटोनी, सराठी, खंडणी, मेंडणी, खैरगाव, वागदरा, वसंतनगर, आवळगाव हे जगलं परिसरातील गावे आहे. यापूर्वी सुद्धा 15 सप्टेंबर ला या परिसरात अनेक शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावलेले आहे. तो नेमका वाघ आहे की वाघीण हे लवकरच कळेल, या परिसरातुन जनतेंनी शक्यतो येणे जाणे करणे टाळावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांनी केले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)