वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिले शिक्षकांना सुरक्षेचे धडे
वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिले शिक्षकांना सुरक्षेचे धडे
विवेक तोटेवार, वणी: विद्यार्थी बसने, ऑटोने शाळेत येतात. त्यांची सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. आपण रस्त्याने पायी चालतो त्यावेळी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. या बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगावे असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी केले.
वणीतील वाहतूक शाखेमध्ये दुपारी 12 वाजता वणीतील शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला ते प्रमुख मार्गदर्शक होते. तर राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या बैठकीत प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस गाड्या, ऑटो याचा आढावा घेऊन या गाड्यांच्या चालक व वाहकासाठी द्यावयाच्या आवश्यक सूचना देण्यात आल्या. घ्यावयाच्या खबरदारीचा उपाय सांगण्यात आले व स्कूल बस साठी शहरातला थांब्याची निर्मिती करण्याची सूचना केली.
या प्रसंगी मुख्याध्यापकांनी त्यांच्या समस्या मांडल्या त्यावर चर्चा करून सभेचा समारोप करण्यात आला. या बैठकीत वणीतील नगरपालिका, खासगी शाळा, कॉन्व्हेंट अशा सुमारे 30 ते 35 शाळेचे मुख्याध्यापक हजर होते.