वाहतूक पोलीसाचा अफलातून फंडा

दंडाच्या पावतीमध्ये हातचलाखी

0
विलास ताजने, वणी : वणी येथील वाहतूक पोलिस दंडाच्या पावतीमध्ये हातचलाखी करून सामान्य दुचाकी चालकांना लुटत असल्याचा प्रकार रविवारी घडला. वणी येथील दत्तू शामराव महाकुलकर हे दि. 31 रोज रविवारला घुगुस येथे स्वतःची दुचाकी क्र. MH 29 X8721 ने एका लग्नाला सहकुटुंब जात होते. वाघदरा लगतच्या कोंडावार निवास जवळ वाहतूक विभागाचे अधिकारी वाहन परवाना तपासत होते.

 

सकाळी साडे अकराच्या दरम्यान घुगुस येथे जात असलेल्या दत्तू महाकुलकर यांची दुचाकी वाहतूक पोलिसांनी थांबवून वाहन चालवण्याचा परवाना मागितला. यावेळी महाकुलकर यांच्याजवळ असलेली वाहन परवाण्याची झेरॉक्स प्रत दाखवली. मात्र पोलिसांनी ओरिजिनल परवाना मागितला. झेरॉक्स चालत नाही म्हणत ओरिजिनल प्रतची मागणी करीत दंडाची रक्कम मागितली. महाकुलकर यांनी दोनशे रुपये देऊन दंडाची (क्र.0106755 )पावती घेतली. लग्न स्थळी सदर घडलेल्या प्रसंगावर मित्रा सोबत चर्चा केली. मित्रांनी पावती पाहताच सदर पावतीवर दुचाकी क्र. MH 34 – 5626 आणि दि. 30 मार्चचा उल्लेख दिसून आला.

 

सदर प्रकाराबाबत शिक्षक दत्तू महाकुलकर यांनी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन हकीकत सांगितली. मात्र त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही. तुम्ही दुसऱ्याची दुचाकी चालवीत असेल. असे उलट प्रश्न केले. विशेष म्हणजे दि. 30 ला महाकुलकर हे सकाळी दहा वाजेपासून यवतमाळ येथे निवडणूक प्रशिक्षणाला उपस्थित होते. मग दुसऱ्याची दुचाकी सदर वेळेला चालवीत असल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. एका जागृत व्यक्ती सोबत सदर प्रसंग घडल्यामुळे सर्व प्रकार उघडकीस आला.

 

(हे पण वाचा: साई मंदिर चौकात रिक्षा चालकांची मनमानी) 

हिच ती पावती…

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.