रवि सेल्स एजन्सीजचे शनिवारी स्थानांतरण

गांधी चौकातील नवीन प्रतिष्ठानात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी शहरातील सुपरिचित असलेल्या रवि सेल्स एजन्सीज या एचपी गॅसच्या प्रतिष्ठानाचे स्थानांतरण होत आहे. दुपारी 12 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. एचपीसीएलचे डीजीएमम मुकुंद जवंजाळ व एचपीसीएलचे एएसएम विशाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होणार असून यावेळी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 28 ऑगस्ट 2021 रोजी रवि सेल्स एजन्सीजला 40 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने या स्थानांतरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी चौक येथील जुन्या प्रतिष्ठानाच्या शेजारील नवीन वास्तूमध्ये रवि सेल्स एजन्सिजचे स्थानांतरण होणार आहे.

सुमारे 40 वर्षांपूर्वी शहरात रवि सेल्स एजन्सिजची सुरूवात झाली. त्यावेळी लोकांमध्ये गॅस सिलिंडर बाबत एक भीती होती. अनेकांना याबाबत शंका कुशंका होत्या. त्याकाळात रवि सेल्स एजन्सिजची शहरात सुरूवात झाली. मात्र अल्पावधीतच त्यांनी लोकांना गॅस इंधनाचे महत्त्व पटवून दिले. आज खेडोपाडी लोक इंधन म्हणून गॅसचा वापर करतात.

गेल्या वर्षीपासून संपूर्ण देश कोरोना माहामारीशी लढत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. लोक घराच्या बाहेर निघण्यास भीत होते अशा वेळी ही रवि सेल्स एजन्सीजतर्फे सेवा अविरत सुरू होती. याशिवाय केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणारे सिलिंडरही गावोगावी घरपोच पोहचविण्याच्या सेवेत एजन्सीतर्फे कधीही खंड पडला नाही.

ग्राहकांसाठी विविध ऑफर
रवि सेल्स एजन्सीजमध्ये 2067 रुपयांमध्ये नवीन सिलिंडर (कनेक्शन) ग्राहकांना घेता येते तर दुसरे सिलिंडर अवघ्या 1668 रुपयांमध्ये घेता येते. याशिवाय 3 बर्नर स्टील टॉप (शेगडी) 3 हजार रुपये, 3 बर्नर ग्लास टॉप 3600 रुपये व 4 बर्नर ग्लास टॉप 3999 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येऊ शकते. तसेच इतर सर्व प्रॉडक्टवर 10 टक्के डिस्कॉउंटही दिले जात आहे.

रवि सेल्स एजन्सीजला परिसरातील ग्राहकांनी भरभरून प्रेम दिले. या पुढेही हे प्रेम असेच कायम ठेवावे असे आवाहन रवि सेल्स एजन्सीजचे रविंद्र निखार व श्रेयस निखार यांच्या तर्फे करण्यात आले आहे. स्थानांतरण सोहळ्यासाठी एजन्सीजचे कर्मचारी परिश्रम घेत आहे.

Comments are closed.