वणीत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, लढा संघटना आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: शहरात वाहतुकी संबंधी अनेक समस्या आहेत. ज्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. खाजगी ऑटो, ट्रॅव्हल्सची मिळेल त्या ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी करतात. वाहतूकीच्या नियमाची पायमल्ली होत आहे. याकडे पोलीस प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असून केवळ सामान्यांकडून दंड वसुली करीत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी यासाठी लढा या संघटनेतर्फे उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन देण्यात आले.

Podar School 2025

वणीतील वरोरा रोडवरील एकता नगर जवळ वणी-नागपूर येथे चालणाऱ्या ट्रॅव्हल्सचा ठिय्या असतो. हा थांबा अनधिकृत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरून हा थांबा हटवून योग्य त्या ठिकाणी हलविण्यात यावा. वणी शहरात अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक ताडपत्री न टाकताच होत असलेली कोळसा वाहतूक वरोरा रेल्वे गेट जवळ होत असलेली ट्रक पार्किंग यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करावी.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

निमशासकीय शाळेत चालणाऱ्या विद्यार्थी वाहतूक वाहनांची तपासणी व आसन क्षमता बघुनच प्रवास करण्याची परवानगी द्यावी. बसस्थानक परिसरातील खाजगी वाहतूक नियमाप्रमाणे 200 मिटरच्या दुर थांबविण्यात यावी. या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले.

काही दिवसात जर ह्यावर तोडगा निघाला नाही तर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी प्रविण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, ललीत लांजेवार, ऍड रुपेश ठाकरे, राहुल झट्टे इत्यादी उपस्थित होते.

Comments are closed.