वणीत प्रहार विद्यार्थी संघटनेद्वारा वृक्षारोपण

प्रजासत्ताक दिनानिमित्त वृक्षरोपणाचा संकल्प

0

बहुगुणी डेस्क, वणी: प्रहार विद्यार्थी संघटना वणी तालुक्याच्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त नांदेपेरा रोड वणी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या कडेला वृक्षरोपणाची विविध झाडे लावण्यात आली.

Podar School 2025

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख तथा धनगर युवा मोर्चाचे संस्थापक अनिकेत चामाटे यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे उपतालुका प्रमुख साई नालमवार, तालुका सरचिटणीस भीमा खोब्रागडे, शहर संघटक गणेश देवाळकर, तालुका संपर्क प्रमुख वृषभ तुराणकर, गौरव ताटकोंडवार (प्रहार सेवक) यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.