महात्मा गांधी हे स्वातंत्र्याचे शिल्पकारच: प्रा एम. घोडमारे

कायर येथे महात्मा गांधींना अभिवादन

0

सुरेंद्र इखारे, वणी: आपल्याला अहिंसात्मक आंदोलनाचे माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना भारतीय स्वातंत्र्यचे शिल्पकार असे म्हणता येईल असे मत प्राध्यापक मधुकर घोडमारे यांनी व्यक्त केले. कायर येथील विवेकानंद विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ही हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ अध्यापक अविनाश ठाकरे हे होते.

प्रमुख उपस्थिती प्रा संजय तेलंग, सुरेन्द्र इखारे, प्रा मधुकर घोडमारे, सोनाली भोयर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय तेलंग यांनी केले तर आभार सतीश घुले यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आकाश बोरूले, दिलीप कंदस्वार, अशोक लोणगाडगे, मधुकर कोडपे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.