जितेंद्र कोठारी, वणी : महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी निमित्त प्रत्येक ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या जाते. मात्र वणी तालुक्यातील दरा (साखरा) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गावात वृक्षारोपणचा वसा घेऊन ग्रामस्थांनी पर्यावरण पूरक पुण्यतिथी साजरी केली. दरा (सा.) वासीयांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने दरा (साखरा) येथे गावातील स्मृतीशेष व्यक्तींच्या नावे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच त्या वृक्षाना ट्रीगार्ड लावून संबंधित स्मृतीशेष व्यक्तीचा नातेवाईकांना संगोपनाची जवाबदारी देण्यात आली. स्व. महादेवराव धर्माजी काळे, स्व. कवडू नारायण नवले, स्व. गणपतराव काळे, स्व. दिलीप महादेवराव काळे, स्व. बापूजी भोसकर, स्व. आदिनाथ नवले, स्व. मधुकर पिंपळशेंडे, स्व. ताराबाई काळे, स्व. रामू रिंगोले, स्व. तुळसाबाई खाडे व स्व. दशरथ रिंगोले यांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात येऊन प्रत्येक ट्रीगार्डवर सुभाषिते लिहण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार जनमानसात रुजविण्याचा संकल्प याप्रसंगी घेण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी गजानन नवले, प्रदीप काळे, प्रदीप नवले, राजू काळे, शंकर काळे, संजय मुसळे, ज्ञानेश्वर पिंपळशेंडे, बाबाराव रिंगोले, तेजराव डुंबारे, ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.