नगर परिषद शाळा क्र ७ मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम
देवेंद्र खरबडे, वणी: 31 जुलैला शनिवारी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 7 मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षण सभापती आरती वांढरे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वृक्ष लागवड करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधूताई गोवारदिपे, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापति आरती वांढरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माधुरी राखुंडे, लता नागतुरे, लता गुप्ता इत्यादी पालक उपस्थित होते.
झाडे हे पर्यावरणाचे रक्षक असून आपले मित्र आहेत त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवावीत असे अवाहन आरती वांढरे यांनी केले .शाळेत मागील वर्षी लावलेली सर्व झाडे जगविल्याबद्दल सभापतिंनी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
पर्यावरणाचे रक्षण केले तरच आपण जिवंत राहू त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे प्रतिपादन सिंधूताई गोवारदिपे यांनी केले. वृक्षारोपणासोबतच शाळेतील किशोरवयीन मुलींना स्वच्छतेचे महत्त्व सांगून या वयातील शारीरिक बदलाबाबत अवगत करण्यात आले व सॅनिटरी नॅपकीनचे वाटप आरती वांढरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन वंदना परसावार यांनी केले तर आभार शुभांगी वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष दुमोरे, चंदू परेकार, विजय चव्हाण, कल्पना मुंजेकर, मंगला पेंदोर, वसंता शेंडे यांनी परिश्रम घेतले .