सुशील ओझा, झरी : तालुक्यातील कोडपाखिंडी येथील आदिवासी दाम्पत्यास ठाणेदारांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केेेेल्याचाा आरोप होतोय. याबाबत एसडीपीओंकडे तक्रार करण्यात आली आहे. पाटण ठाणेदारावर याप्रकरणी कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील कोडपाखिंडी येथे आदिवासी दाम्पत्य वास्तवास आहे. उपसरपंचाचे पती हरी नारायण राऊत हे ३१ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी आले होते. घरासोरील स्ट्रीट लाईट गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे, ते दुरुस्त करून द्या, असे म्हटले असता हरी राऊत यांनी मला वेळ नाही, मी माझ्या मर्जीने काम करीन, तुझ्या म्हणण्याने काम करणार नाही, असे म्हटले. यावरून तिघात शाब्दिक वाद झाल्यानंतर ते घरी निघून गेले व पतिविरुद्ध तक्रार दिली. .
दुसऱ्या दिवशी १ नोव्हेंबरला पाटण पोलीस कर्मचारी गाडी घेऊन दाम्पत्याच्या घरी आले व तुमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार आहे, असे सांगितले. महिला, पती व गावातील अनिल खडसे याला सोबत घेऊन गेले.
यावेळी ठाणेदार शिवाजी लष्करे होते. त्यांच्यासमोर हजर केले व थोड्याच वेळात तक्रारकर्ता उपसरपंचाचे पती त्याठिकाणी आले. ठाणेदारांना आमच्याबद्दल भडकावून सांगितल्यामुळे त्यांनी जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून तुम्ही भांडण करता असे म्हटले. त्यानंतर महिलेच्या डोक्याचे केस पकडून ओढले व हातही धरून ओढले. यामुळे हातातील बांगड्या फुटल्या. तसेच महिलेला ओढाताण करीत असताना तिचा पती सोडविण्याकरिता गेला असता, त्यालाही जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या गालावर थापडा व खाली वाकवून लाथाने पाठीवर मारहाण केली..
सोबत आलेले तेजराव खडसे यांनाही मारहाण करण्यात आली, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. तक्रारीतून ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोडपाखिंडी येथील महिलेने पाटण ठाणेदाराविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी दिली..