खाकी वर्दीतील वारली चित्रकार शेखर वांढरे यांचा सत्कार
चित्राच्या माध्यमातून जनजागृती करणा-या चित्रकाराचा सन्मान
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे वणी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले वारली चित्रकार शेखर वांढरे यांचा सत्कार करण्यात आला. वणी शहराचे माजी नगराध्यक्ष विजय मुकेवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
शेखर वांढरे हे वणी पोलीस दलात कार्यरत राहून विविध दिनविशेष, घटना यावर भाष्य करणारी वारली चित्र काढून जनजागृती करण्याचे काम सातत्याने करत आले आहे. पाणी वाचवा, बेटी बचाव, पर्यावरण, मतदार नोंदणी, हर घर तिरंगा, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव इत्यादी अनेक विषयांवरचे त्यांचे चित्र प्रसिद्ध आहे. त्यांच्या या कार्याबाबत विश्वकर्मा गणेश मंडळातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी रूपक अंड्रस्कर, कल्पक अंड्रस्कर, शुभम झिलपे, ऋतिक झिलपे, अभय गटलेवार, दिनेश साखरकर, राजू साखरकर, दीपक साखरकर, प्रशांत झिलपे, शुभम बर्डे, अतुल डाखरे, सुहास झिलपे, मयूर झिलपे, किशोर झिलपे, आदी उपस्थित होते. श्री विश्वकर्मा गणेश मंडळ हे गणेशोत्सवात रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करते.
Comments are closed.