शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त वणीतून निघणार भव्य त्रिशूल यात्रा

विविध कार्यक्रमांचे आयोजन, तारेंद्र बोर्डे यांचा उपक्रम

 

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त वणी ते महादेवगड (शिरपूर) अशी 15 किलोमीटरची त्रिशूलयात्रा निघणार आहे. बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून सकाळी 8 वाजता या यात्रेला सुरूवात होणार आहे. या पदयात्रेचे 251 किलोंचा त्रिशूल खांद्यावर घेऊन सर्व भाविक वणी ते शिरपूर अशी पदयात्रा काढणार आहे. शहराचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेला मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी परिसरातील भाविक महाशिवरात्र महादेवगड शिरपूर येथे जाऊन साजरी करतात. गेल्या वर्षीपासून वणी ते शिरपूर अशी त्रिशूलयात्रा काढली जात आहे. यावर्षी उडता त्रिशूल व दिल्ली येथील शिवतांडव हे यात्रेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. शिवाय स्थानिक टीमचे प्रात्यक्षिके यावेळी होणार आहे. ज्या भाविकांना अभिषेक करायचा असेल त्यांच्यासाठी वाराणसी येथून आणलेले पवित्र गंगाजल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या पदयात्रेत जैन ले आऊट, आंबेडकर चौक, गणेशपूर, गोकुळनगर इत्यादी भागातील भाविक त्रिशूल घेऊन सहभागी होणार आहे. वणी ते शिरपूर अशा निघणा-या मार्गात बाहेर गावातील भाविक देखील त्रिशूल घेऊन जुळणार आहेत. टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, रंगनाथ स्वामी मंदिर, गोकुळनगर, लालगुडा चौपाटी ते शिरपूर असा या त्रिशूल रॅलीचा मार्ग राहणार आहे. ठिकठिकाणी त्रिशूलयात्रेचे स्वागत केले जाणार आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन – तारेंद्र बोर्डे
गेल्या वर्षीचा भाविकांचा प्रतिसाद पाहता व परंपरा सुरु ठेवण्यासाठी या वर्षी आणखी भव्य स्वरुपात ही त्रिशूल यात्रा निघणार आहे. उडता त्रिशूल तसेच दिल्ली येथील देखावे या यात्रेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. या यात्रेची संपूर्ण तयारी झालेली आहे. यात्रेत सहभागी होणा-या सर्व भाविकांची काळजी आयोजकाद्वारे घेतली जाणार आहे.
– तारेंद्र बोर्डे, माजी नगराध्यक्ष

यात्रेला अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत भालेराव, गजानन कासावार, नीलेश परगंटीवार, कुणाल चोरडिया, अनिल अक्केवार, बंडू चांदेकर, नीलेश पोल्हे, जयेश चोरडिया, मनिष गायकवाड, सारंग बिहारी, निखिल खाडे, गुंजन इंगोले, शरद ढुमणे, सुभाष बिलोरिया, अनिल रेभे, मंगेश झाडे, किशोर बावने यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे सदस्य परिश्रम घेत आहे.

Comments are closed.