ब्राह्मणी फाट्याजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

0

गिरीश कुबडे, वणी: ब्राह्मणी फाट्याजवळ एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

वणी तालुक्यातील निळापूर येथील मारोती ठावरी (34) हा ट्रक चालक आहे. गेल्या 6 तो दिवसांपासून घरी आला नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो न मिळाल्याने 24 जुलै रोजी मारोतीच्या कुटूंबियांनी वणी पोलीस स्टेशन येथे मारोती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यानंतर तब्बल सहा दिवसानंतर मारोतीचा मृतदेह ब्राम्हणी फाट्याजवळच्या नाल्यात आढळला. मृतदेहाची उत्तरनिय तपासणी करून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे. मारोतीच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आता संकटाची कु-हाड कोसळली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.