ट्रकची उभ्या दुचाकीला धडक, ब्राह्मणी फाट्याजवळ अपघात

कोळसा वाहतूक करणा-या ट्रकची बेशिस्त वाहतूक सुरुच

बहुगुणी डेस्क, वणी: एका ट्रकने एका दुचाकीस्वाराला धकड दिली. यात युवक थोडक्यात बचावला. गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4.45 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी फाट्याजवळ हा अपघात झाला. सदर युवक हा भालर येथील रहिवासी आहे. तो ब्राह्मणी फाट्याजवळील टर्निंगवर दुचाकीशेजारी उभा होता. दरम्यान कोळशाची वाहतूक करणारा ट्रक (MH 29 BE 9988) कोलारपिंपरी कोळसाखाणीत कोळसा भरण्यासाठी जात होता. ब्राह्मणी फाट्याजवळील टर्निंगवर ट्रकने उभ्या दुचाकीला (MH 29 Z 5788) जबर धडक दिली. दुचाकीला धडक बसताच दुचाकीस्वाराने तात्काळ दुचाकी सोडून उडी मारली. तर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आहे. यावेळी दुचाकीस्वार ओरडल्याने ट्रकचालकाने ट्रक थांबवला. अन्यथा दुचाकीचा चेंदामेंदा झाला असता. अपघातात तरुणाच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे. या अपघातामुळे कोळसा वाहतूक करणा-या ट्रकची बेशिस्त वाहतूक सुरुच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात कोळसा वाहतूक करणा-या एका ट्रकचालकाने एका दुचाकी स्वाराला उडवले होते. 

Comments are closed.