दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू

दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी...

बहुगुणी डेस्क, वणी: दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीचालक जखमी आहे. शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील पिसगाव ते पाथरी रोडवर ही घटना घडली. मोहन जयराम पाचभाई (54) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शामराव मालेकार असे जखमीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत मोहन जयराम पाचभाई (54) हे पिसगाव येथील रहिवारी होते. ते शनिवारी दिनांक 31 मे रोजी सकाळी त्यांच्या दुचाकीने मारेगाव येथे कामानिमित्त गेले होते. संध्याकाळी ते मारेगावहून पिसगाव येथे परतत होते. तर शामराव मालेकार हे भालेवाडी येथील रहिवासी आहे. ते संध्याकाळच्या सुमारास मार्डीहून मारेगाव येथे जात होते. दरम्यान 7 वाजताच्या सुमारास पिसगाव ते पाथरी येथे या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

अपघाताची माहिती मिळताच रोडवर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मोहन यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केल. तर दुस-या दुचाकीवरील शामराव मालेकार यांची तब्येत देखील गंभीर असल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे पिसगावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची नोंद केली व त्यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.