अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघे मित्र जखमी

जेवण झाल्यानंतर फिरणा-या दोघांना तहसीलजवळ धडक

भास्कर राऊत, मारेगाव: जेवण झाल्यानंतर फिरायला गेलेल्या दोन तरुणांना एका भरधाव वाहना ने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही जखमी झाले आहे. गुरुवारी रात्री 8.00 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे मारेगाव-यवतमाळ रोडवर घडली. सध्या जखमी वर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.

Podar School 2025

प्रदीप श्यामसुंदर देवाळकर (35) व दीपक प्रभूदास नवले (35) हे मित्र असून शहरातील वार्ड क्रमांक 13 मधील रहिवाशी आहेत. गुरुवारी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता ते जेवण आटोपून घरा समोरील वणी यवतमाळ रोडवर पायदळ फिरत होते. दरम्यान तहसील नजीक जुन्या पोस्ट जवळून ते फिरताना वणी कडून एक अनियंत्रित व भरधाव वाहन आहे. या वाहनाने दोन्ही मित्रांना जोरदार धडक दिली व वाहन करंजीच्या दिशेने सुसाट पळून गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अपघात घडताच परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यांनी दोन्ही जखमीना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दोन्ही जखमीना चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून खासगी रुग्णालयात त्यांचेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

या संदर्भात मीरा श्यामसुंदर देवाळकर यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात वाहन चालकाचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

हे देखील वाचा:

मारेगाव तालुक्यातील शेतकरी अजूनही पिकविम्याच्या प्रतीक्षेत

पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या इसमाचा बुरांड्याजवळ अपघात

Comments are closed.