मध्यरात्री संशयास्पदरित्या फिरणा-या दोघांना अटक

नांदेपेरा ते रांगणा रोडवर पोलिसांची कारवाई

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा ते रांगणा रोडवर संशयास्पदरित्या फिरणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले दोघेही राळेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Podar School 2025

मंगळवारी दिनांक 30 जुलैच्या रात्री वणी पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत होते. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास (बुधवारी) नांदेपेरा ते रांगणा गावालगत दोन इसम स्वत:चा चेहरा झाकून रोडलगत छपत छपत जात होते. पेट्रोलिंग करणा-या पथकाची नजर या दोघांवर पडली. त्यांना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पथकानी दोघांना थांबवून सदर ठिकाणी काय करत आहे? याबाबत विचारणा केली. मात्र ते उडवा उडवीचे उत्तरे देत होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्या दोघांचा नाव पत्ता विचारला. त्यांनी ते राळेगाव तालुक्यातील असल्याचे सांगितले. त्यांची तपासणी केली असता त्यातील एकाकडे टेस्टर आढळून आले. पोलिसांना हे दोघे काहीतरी गुन्हा घडवण्याच्या उद्देशाने आल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी  दोघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी जनार्धन गुलगष पवार (45) व माधव बिबिचीन राऊत (35) दोघेही रा. उमरवीर ता. राळेगाव यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 122 (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

परिसरात बाहेरगावातील चोरट्यांचा धुमाकूळ
संपूर्ण वणी तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. बंद घर म्हणजे चोरी असे एक समीकरण बनले आहे. याशिवाय दुचाकी चोरट्यांचाही चांगलाच हैदोस सुरु आहे. काही दिवसांआधी बांधकाम सुरु असलेल्या घरातील इलेक्ट्रिक फिटिंगचा वायर चोरण्याचे अनेक प्रकार समोर आले होते. तसेच ग्रामीण भागात शेतातून जाणा-या इलेक्ट्रिक खांबावरचा तार देखील चोरण्याचे प्रकार घडत असतात. यातील काही प्रकाराचा छडा देखील लागला आहे. यात अनेक चोरटे हे बाहेरगावातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Comments are closed.