जितेंद्र कोठारी, वणी: डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन (चिठ्ठी) शिवाय प्रतिबंधीत औषधांची विक्री केल्या प्रकरणी वणीतील दोन औषध विक्रेत्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मन्साराम पांडे (वय 54 वर्ष) व उज्ज्वल प्रकाश पांडे (वय 27 वर्ष) दोघे रा. वणी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहे. दोघे कमान चौक येथील प्रिन्स मेडिकलचे मालक आहे.
अन्न व औषध प्रशासन यवतमाळच्या औषध निरीक्षक श्रीमती सविता भास्कर दातीर यांच्या फिर्यादवरून वणी पोलीस ठाण्यात औषधे व सौन्दर्य प्रसाधन कायद्यासह, भारतीय दंड संहितेनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक औषधांची डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नाही. मात्र वणीतील प्रिन्स मेडिकल येथे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कामोतेजनार्थ वापरल्या जाणा-या व झोपेच्या गोळ्या दुप्पट तिप्पट भावात विकल्या जात असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन यास मिळाली होती. माहितीवरून तपासणी पूर्व ड्रग इन्स्पेक्टर दातीर यांनी 11 डिसें. रोजी बोगस ग्राहक पाठवून सुहाग्रा या कामोत्तेजक औषधची मागणी केली.
प्रिन्स मेडिकल मधील फार्मासिस्ट उज्ज्वल पांडे यांनी बोगस ग्राहकाला औषध देताच दातीर यांनी दुकानावर धाड मारली. तपासणीत दुकानात मुदतबाह्य तसेच टॅबलेटच्या स्ट्रीपवरील बॅच नंबर, एक्सपायरी डेट व एम आर पी खोडलेल्या व विना बिलाची औषध मिळाली. औषध अधिकाऱ्यांना दुकानातून शेड्युल H च्या Suhagra 100 mg, 20mg, Tadalafil 20 mg , Alprafresh 0.5 mg ही औषधे जप्त केली.
जप्त औषधीचे बिल सादर न केल्यामुळे औषध निरीक्षक दातीर यांनी रविवार 19 डिसें. रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरुद्द कलम 420, 188, 273, 177, 34 भादवी सहकलम 18(अ), 27, 28(अ) औषधे व सौन्दर्य प्रसाधने कायद्यांव्ये गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या संदर्भात पोउनी गोपाल जाधव तपास करीत आहे.
हे पण वाचा:
हे पण वाचा: