तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या, उडाली एकच खळबळ

पुनवट येथील तरुणीची तर चिखलगाव येथील एका इसमाचा गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारचा दिवस वणी तालुक्यासाठी काळा ठरला. संध्याकाळी तालुक्यात भीषण वादळाने झोडपले तर दिवसा आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या. तालुक्यातील पुरड (पुनवट) येथील एका तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तर चिखलगाव येथील एका इसमाने घरातच गळफास घेतला. शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी एकाच दिवशी दोन आत्महत्या उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पहिली घटना ही चिखलगाव येथील आहे. मृतक संभा बापूराव निकोडे (55) हे चिखलगाव येथील रहिवासी होते. शुक्रवारी घरी कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी गळफास घेतला. त्यांचे कुटुंबीय जेव्हा घरी परतले तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दुसरी आत्महत्येची घटना शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पुरड (पुनवट) येथे घडली. कु. पायल बालाजी उरकुडे (25) असे मृत तरुणीचे नाव आहे. पायलचे आईवडील सकाळी शेतीच्या कामासाठी गेले होते. दुपारी जेव्हा तिचे आई वडील शेतातून घरी परतले, तेंव्हा त्यांना पायलने घरात गळफास घेतल्याचे आढळले. पायलने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. तिच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फक्त एका महिन्याच्या उन्हाळी शिबिरात चेसमध्ये एक्सपर्ट व्हा!

वणीत वादळाचा कहर… झाडे कोसळलीत, टिनपत्रे उडाली, पोल वाकले…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.