चोरलेली दुचाकी विकताना दोन चोरट्यांना अटक

दुचाकीची होणार होती विक्री, मात्र त्याआधीच फुटले बिंग

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूरहून चोरून आणलेली दुचाकी वणीला विकताना दोन चोरट्यांना सेवानगर येथून अटक करण्यात आली. आज दिनांक 3 जून रोजी वणी पोलिसांतर्फे ही कार्यवाई करण्यात आली. तुषार उर्फ रावण रमेश कुडमेथे वय 25 व राजकुमार नैताम वय 30 दोघेही राहणार जुनी बस्ती बुटीबोरी नागपूर असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहेत.

तुषार व राजकुमार या दोन्ही आरोपींनी रविवारी दिनांक 2 जून रोजी एका मंगल कार्यालयासमोरून एक लाल रंगाची पॅशन प्रो (MH40 AW9229) ही दुचाकी चोरली. त्यानंतर ते आज वणीत या दुचाकीची विक्री करण्यासाठी आले होते. याची गोपनीय माहिती वणी पोलिसांना मिळाली होती.

दरम्यान पोलीस जमादार विकास धडगे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्या पथकाला सेवानगर परिसरातील स्मशानभूमीजवळ दोन्ही आरोपी संशयास्पद रित्या आढळून आले. त्यांनी या दोघांना विचारपूस केली असता त्यांनी दुचाकी नागपूर येथून चोरून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींना बुटीबोरी पोलिसांना हस्तांतरीत केले जाणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर कारवाई गणेश किन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाचे विकास धडगे, पंकज उंबरकर, गजानन कुळमेथे, सागर सिडाम, पोलीस जमादार गजानन डोंगरे यांनी पार पाडली.

गर्लफ्रेंडने केले ब्रेकअप, एक्सची नवीन बॉयफ्रेंडला मारहाण

Comments are closed.