सुविधा लॉन्स समोरुन दुचाकी लंपास

वणीत दुचाकी चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ

0

जितेंद्र कोठारी, वणी: येथील मुकूटबन मार्गावरील सुविधा लॉन्स समोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना 29 जानेवारी रोजी घडली. याबाबत फिर्यादी तुषार नंदकिशोर मेहता रा. मंगलम पार्क वणी यांनी शुक्रवार 5 फेब्रुवारी रोजी वणी पो.स्टे. येथे तक्रार दाखल केली.

Podar School 2025

तक्रारीनुसार तुषार मेहता हे 29 जाने. रोजी सायंकाळी जेवण करुन फिरण्यासाठी बाहेर निघाले. तेव्हा त्यांनी आपली हिरो स्प्लेंडर आय स्मार्ट मोटरसायकल (MH29 AY 7224) सुविधा लॉन समोर उभी करून पायी फिरायला निघाले. 15 ते 20 मिनिटानंतर तुषार परत आले असता तिथे उभी केलेल्या जागेवर मोटरसायकल दिसून आली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

इकडे तिकडे शोध घेऊनही मोटरसायकल मिळून आली नाही. शेवटी तुषार मेहता यांनी 5 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यानी त्याची 50 हजार किमतीची दुचाकी चोरून नेल्याची तक्रार ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केले आहे.

मागील काही दिवसापासून शहरात दुचाकी चोरट्यानी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे दुचाकी चोरीच्या बहुतांश घटनेत हिरो स्प्लेंडर व पेशन प्रो गाड्यांवर चोरट्यानी हात साफ केले आहे. त्यामागचे कारण स्प्लेंडर व पेशन प्रो दुचाकींचे हँडल लॉक लवकर तुटत असल्याचे बोलले जाते. पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनेवर लवकरात लवकर पायबंद घालावे अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा: 

केसुर्ली येथे विवाहितेची आत्महत्या, दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न

Leave A Reply

Your email address will not be published.