सावधान…! चिखलगाव रोडवरील मॉलसमोरून दुचाकी चोरी

शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबेना....

विवेक तोटेवार, वणी: शहरातील चिखलगाव रोडवरील एका जिमसमोरून एक दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी दुचाकी मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातत्याने होणा-या दुचाकी चोरीमुळे वणीकर चांगलेच हैराण झाले असून हे सत्र कधी थांबणार? असा सवाल सर्वसामान्य वणीकर उपस्थित करीत आहे.

फिर्यादी नितीन नामदेवराव खारे (58) हे वणीतील देशमुखवाडी येथील रहिवासी असून ते एका किराणा दुकानात काम करतात. त्यांच्याकडे हिरो कंपनीची एचएफ डिलक्स ही काळ्या रंगाची दुचाकी (MH-29-BG 2310) आहे. ही दुचाकी त्यांचा मुलगा तेजस खारे हा वापरत होता. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी तेजस हा चिखलगाव रोडवरील एका जिममध्ये संध्याकाळी दुचाकीने कामासाठी गेला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

काम संपल्यानंतर रात्री 9 वाजता तो परत आला असता त्याला दुचाकी आढळून आली नाही. कुणी गैरसमजुतीने दुचाकी नेली असल्याचा समज करून त्याने काही वेळ दुचाकीची वाट पाहिली. मात्र दुचाकी आढळून आली नाही. त्यामुळे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचा संशय आला.

अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल केली. मंगळवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.