सराईत दुचाकी चोरट्याला अटक, 4 दुचाकी जप्त

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरक्ष; उच्छाद मांडला आहे. शहरातील विविध भागातून दर रोज होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनेमुळे पोलीस विभागसुद्धा हैराण झाले होते. दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी ठाणेदार अजीत जाधव व स्थानिक गुन्हा शाखा पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून अट्टल दुचाकी चोरट्याला चंद्रपूर जिल्ह्यातून अटक केली. पोलिसानी वणी परिसरातील विविध भागातून चोरी गेलेली 4 दुचाकी वाहन चोरट्याच्या ताब्यातून जप्त केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नितीन उर्फ बिट्टू नत्थूजी मारबते (24) रा. नांदाफाटा, ता.कोरपणा, जि. चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या अट्टल दुचाकी चोरट्याचा नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून अॅक्टीव्हा मोपेड 1 किमत 30 हजार, हीरो होंडा स्पलेंडर प्लस मोटरसायकल 2 किमत 40 हजार व हीरो आय स्मार्ट मोटरसायकल 1 किमत 30 हजार असा एकूण 1 लाख रुपयाची 4 दुचाकी जप्त केली.

कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पो. अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, एलसीबी प्रमुख पो.नि. आधारसिंग सोनोने, पो. नि. अजित जाधव यांचे मार्गदर्शनात वणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे सहा. पो. नि. अतुल मोहनकर, पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे, विकास धाडसे, सुधीर पांडे, शुभम सोनुले, सुनील नलगंटीवार, सागर सिडाम यांनी पार पाडली.  

Comments are closed.